Mumbai : ट्रॅफिकची चिंता सोडा! आता मुंबईकर करतील अंडर ग्राऊंड प्रवास, 4 ठिकाणांसाठी BMC चा भन्नाट प्लॅन
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Underpass Construction In Mumbai : मुंबईकरांचा वेळ आता मोठ्या प्रमाणात वाचणार असून त्यासाठी BMC ने शहरातील चार ठिकाणांसाठी अंडरपास प्रकल्प सुरु केला आहे.
मुंबई : मुंबईत वाहनांची वाढती संख्या आणि रस्ते ओलांडताना होणारा धोका लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकाने शहरात एक्सेस कंट्रोल अंडरपास उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण चार ठिकाणी हे अंडरपास उभारले जाणार आहेत. या प्रकल्पावर सुमारे 800 ते 900 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
सध्या 'या' ठिकाणी सुरु आहे काम
बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वेकडील एक्सप्रेस हायवेवरील अण्णाभाऊ साठे पुलाखाली एक्सेस कंट्रोलचे काम सुरू झाले आहे. तर पश्चिमेकडील एक्सप्रेस हायवेवर तीन ठिकाणी हे काम लवकरच सुरू होणार आहे. या ठिकाणांमध्ये बोरीवलीतील सुधीर फडके रोड, विलेपार्ले येथील हनुमान रोड आणि सांताक्रूझमधील मिलन सब-वे परिसराचा समावेश आहे.
advertisement
पश्चिम एक्सप्रेस हायवेवर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा होत असल्याने वाहतुकीला अडथळा न येऊ देता काम करण्यासाठी बॉक्स पुशिंग या अत्याधुनिक पद्धतीचा वापर केला जाणार आहे.
बॉक्स पुशिंग म्हणजे काय?
'बॉक्स पुशिंग' ही अशी बांधकाम तंत्रज्ञान पद्धत आहे. ज्यात वाहतूक बंद न करता रस्त्याखाली अंडरपास तयार केला जातो. या पद्धतीत आधीच तयार केलेले आरसीसी बॉक्स मोठ्या जॅकच्या सहाय्याने जमिनीत पुढे ढकलले जातात. बॉक्स पुढे सरकताना त्यातील माती बाहेर काढली जाते आणि त्यामुळे वरचा रस्ता खुला राहतो.
advertisement
एक्सेस कंट्रोलचा उद्देश
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना गाड्यांच्यामधून रस्ता ओलांडावा लागू नये आणि अपघातांची शक्यता कमी व्हावी हा आहे. नागरिकांना सुरक्षित आणि सुलभरीत्या हायवे ओलांडता यावा यासाठी या अंडरपासचा उपयोग होईल.
पूर्वेकडील एक्सप्रेस हायवे सुमारे 23.55 किलोमीटर लांब असून पश्चिमेकडील एक्सप्रेस हायवे सुमारे 24 किलोमीटर आहे. हा मार्ग माहिमपासून सुरू होऊन बांद्रा, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, बोरीवली, दहिसरमार्गे मीरा-भाईंदर आणि पुढे वसई-विरार आणि गुजरातकडे जातो.
advertisement
बीएमसीने आगामी काळात एकूण आठ ते नऊ अशा एक्सेस कंट्रोल अंडरपास उभारण्याची योजना आखली असून त्यामुळे मुंबईतील रस्ते अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित होतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 12:57 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : ट्रॅफिकची चिंता सोडा! आता मुंबईकर करतील अंडर ग्राऊंड प्रवास, 4 ठिकाणांसाठी BMC चा भन्नाट प्लॅन


