पंडित नथुराम गोडसे विचाराचे लोक महाराष्ट्रात तोपर्यंत..., सदावर्तेंचा राज ठाकरेंना थेट इशारा
- Published by:Sachin S
Last Updated:
राज ठाकरे म्हणतात चोरी चोरी झाली आहे. मग राज ठाकरेंकडे वकील नाहीये का, ते कोर्टात जाणार नाही का?
मुंबई:  'आमचं मागणं हे मुंबई बंद झाली नाही पाहिजे. लाखो लोक काम करत असतात, त्यांचं हातावर पोट आहे.  उद्याची मुंबई वेठीस धरणे, मुंबईला त्रास देण्याआधी राज ठाकरे यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली. तसंच, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंडित नथुराम गोडसे यांच्या विचाराचे लोक महाराष्ट्रात आहे, तोपर्यंत राज ठाकरे यांचं काही चालणार नाही' असंही सदावर्ते म्हणाले.
मत चोरी प्रकरणी ठाकरे गट आणि मनसेनं सत्या मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चावर गुणरत्न सदावर्ते कमालीचे संतापले. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर विखारी टीका केली.
'राज ठाकरे यांच्या मोर्चामुळे ज्यांना एक दिवसाची रोजंदारी मिळते ती मिळणार नाही. राज ठाकरे म्हणतात चोरी चोरी झाली आहे. मग राज ठाकरेंकडे वकील नाहीये का, ते कोर्टात जाणार नाही का, परंतु, मात्र हुल्लडबाजी सारखं बोलणं थांबवणार नाही. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, पंडित नथुराम गोडसे यांच्या विचाराचे लोक महाराष्ट्रात आहे, तोपर्यंत राज ठाकरे यांचं काही चालणार नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी जास्त बोलू नये. एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणींचा आशिर्वाद आहे. लाडक्या बहिणी जर घराबाहेर आल्या तर डोक्यावर केस राहणार नाही' असा इशाराच सदावर्तेंनी दिला.
advertisement
'लोकशाहीमध्ये मोर्चा करण्याची मागणी सगळ्यांना आहे पण संस्थांना वेठीस धरण्याचं काम कुणीही करू नये. राज ठाकरे जे प्रकारे मागणी करत आहे. त्यांची मागणी ही गुन्हेगारी स्वरुपाची आहे.  एक राज ठाकरे म्हणताय, मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. त्यांनी पुन्हा एकदा गुन्हेगारी विचार मांडले आहे. सुट्टी दिली नाहीतर बॉसच्या कानाखाली मारा, अशी हिंसक भाषा वापरत आहे. याला संविधानामध्ये थारा नाही, असंही सदावर्ते म्हणाले.
advertisement
चाटूगिरीचा अर्थ राज ठाकरे यांना माहित आहे का? 
view comments'राज ठाकरे कायदा व सुव्यवस्थेचा विचार करत नाही. मोर्चानंतर राज ठाकरेंची मुलं 5 स्टार मध्ये जावतील. त्यांच्या मुलांना फरक पडत नाही. सामान्य मुलांची नोकरी गेली तर राज ठाकरे काय करणार? शरद पवार का बोलत नाहीत. राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल लोटांगण आणि चाटूगिरी करणारे व्यक्त केलं. आता याबद्दल शरद पवार काही ट्वीट करणार नाही का.  चाटूगिरीचा अर्थ राज ठाकरे यांना माहित आहे का? एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणींचं समर्थन आहे. आता शरद पवार यांनी काही तरी बोललं पाहिजे, असंही सदावर्ते म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 7:04 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
पंडित नथुराम गोडसे विचाराचे लोक महाराष्ट्रात तोपर्यंत..., सदावर्तेंचा राज ठाकरेंना थेट इशारा


