प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वे मार्गावर साडेचार तासांचा मेगाब्लॉक!

Last Updated:

Western Railway Mega Block: ब्लॉकदरम्यान बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरील सर्व गाड्या अप धीम्या मार्गावरून धावतील. तसंच काही गाड्या रद्द करण्यात येतील.

काही गाड्यांचा प्रवास शेवटच्या स्थानकाआधीच थांबेल.
काही गाड्यांचा प्रवास शेवटच्या स्थानकाआधीच थांबेल.
मुंबई : प्रवाशांनो लक्ष असूद्या...पश्चिम रेल्वेनं ब्लॉक आयोजित केला आहे. गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामकाजासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. चालू दिवसांत हा ब्लॉक असल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, जेणेकरून गैरसोय होणार नाही.
पश्चिम रेल्वे मार्गावर 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर दरम्यानच्या मध्यरात्री साडेचार तासांचा ब्लॉक असेल. याचा अप आणि डाऊन जलद मार्गावरील गाड्यांवर परिणाम होईल. मध्यरात्री 12.15 वाजल्यापासून पहाटे 4.45 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास होऊ शकतो.
advertisement
ब्लॉकदरम्यान बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरील सर्व गाड्या अप धीम्या मार्गावरून धावतील. तसंच काही गाड्या रद्द करण्यात येतील किंवा शेवटच्या स्थानकाआधीच काही गाड्यांचा प्रवास थांबेल.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम सुरू आहे. त्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून ब्लॉक घेण्यात आला. एकूणच 3 रात्रीच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं.
मराठी बातम्या/मुंबई/
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वे मार्गावर साडेचार तासांचा मेगाब्लॉक!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement