रात्री साडेबारा वाजता घरी जात होती फ्रेंच शिक्षिका, पाठीमागून नराधम आला अन्... मुंबईला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईच्या खार परिसरात एका २७ वर्षीय तरुणीचा विनयभंग करून पळून गेलेल्या आरोपीला खार पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
मुंबईच्या खार परिसरात एका २७ वर्षीय तरुणीचा विनयभंग करून पळून गेलेल्या आरोपीला खार पोलिसांनी अखेर अटक केली आहे. सुनिल विष्णू वाघेला (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्कूटीच्या क्रमांकावरून तपास करत पोलिसांनी त्याला धारावी परिसरातून ताब्यात घेतलं. या गुन्ह्यात आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.
स्कूटीवरून येऊन केला होता विनयभंग
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी वांद्रे येथे राहणारी असून ती फ्रेंच शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. ही घटना गेल्या आठवड्यात घडली, जेव्हा ती खार येथील तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ती मैत्रिणीच्या घरातून बाहेर पडून पायी रस्त्याने चालत होती.
नेमक्या याच वेळी, स्कूटीवरून आलेल्या एका तरुणाने तिला थांबवून तिच्या छातीला नकोसा स्पर्श केला आणि तिचा विनयभंग केला. या कृतीनंतर आरोपीने तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला होता.
advertisement
सीसीटीव्ही आणि स्कूटीमुळे आरोपी जेरबंद
या घटनेनंतर पीडित तरुणीने तातडीने खार पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. तिच्या तक्रारीनंतर खार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवत आरोपीचा तातडीने शोध सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. या फुटेजच्या आधारे पोलिसांना आरोपीच्या स्कूटीचा क्रमांक प्राप्त झाला. या स्कूटीच्या नोंदणी क्रमांकावरून पोलिसांनी मालकाचा शोध घेतला असता, त्यात सुनिल विष्णू वाघेला याचं नाव समोर आलं.
advertisement
अखेरीस, पोलिसांनी अत्यंत चलाखीने तपास करत आरोपी सुनिल वाघेलाला धारावी येथून ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास खार पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 7:43 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
रात्री साडेबारा वाजता घरी जात होती फ्रेंच शिक्षिका, पाठीमागून नराधम आला अन्... मुंबईला हादरवणारी घटना!


