advertisement

Konkan Railway : कोकणी माणसा जागा हो…! गोरखपूर एक्स्प्रेससाठी कोकणातील गाडीवर 'वरवंटा', माजी रेल्वेमंत्र्यांचाही संताप

Last Updated:

कोकणवासियांनी मागच्या अनेक वर्षापासून आंदोलने आणि मध्य रेल्वेशी पत्र व्यवहारही केला होता. मात्र या इशाऱ्यानंतरही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दादरवरून गोरखपूर एक्सप्रेसलाच हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरात राहणाऱ्या कोकणवासियांवर मोठा अन्याय झाला आहे.

konkan railway
konkan railway
Dadar Ratnagiri Passenger Train, Konkan Railway : कोकणवासियांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोकणवासियांच्या हक्काची दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन ही कोरोना नंतर बंद करण्यात आली होती. आणि त्या ट्रेनच्या जागी गोरखपूर एक्सप्रेस ही गाडी सूरू करण्यात आली होती. त्यामुळे कोकणवासियांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला होता.या ट्रेनसाठी कोकणवासियांनी मागच्या अनेक वर्षापासून आंदोलने आणि मध्य रेल्वेशी पत्र व्यवहारही केला होता. मात्र या इशाऱ्यानंतरही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दादरवरून गोरखपूर एक्सप्रेसलाच हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरात राहणाऱ्या कोकणवासियांवर मोठा अन्याय झाला आहे.तसेच कोकणवासियांमध्ये संताप आहे.
खरं तर मागच्या अनेक वर्षापासून कोकणात जाण्यासाठी चाकरमानी दादर-रत्नागिरी या एकमेव पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करायचे.पण कोरोना महामारीनंतर अचानक ही गाडी रद्द करण्यात आली होती.त्यानंतर ही गाडी सूरू होईल अशी अपेक्षा होती. पण अचानक रेल्वेने त्या जागी उत्तरप्रदेशला जाणारी गोरखपूर एक्सप्रेस सूरू केली होती. त्यामुळे मुंबईसह उपनगरातून या कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा झटका बसला होता.
advertisement
advertisement
मुंबईसह उपनगर आणि पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी हे कोकणात जातात. पश्चिम रेल्वेच्या भागात पडणाऱ्या प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी दादर रत्नागिरी पॅसेंजर हा एकमेव पर्याय होता. चाकरमानी गणेशोत्सव, शिमगोत्सव, दिवाळी आणि होळी सणानिमित्त गावी जात असतात.पण या प्रवाशांना आता दादरवरून गोरखपूर एक्सेप्रेस सूरू झाल्याने मोठा झटका बसला आहे. या संदर्भात अनेकदा आंदोलने करण्यात आली आणि मध्य रेल्वेला निवेदन देण्यात आली. मात्र त्यानंतर आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रक काढून दादर-गोरखपूर कायमस्वरूपी सूरू राहणार असल्याची माहिती दिली आहे.त्यामुळे कोकणवासियांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
त्यामुळे आता दादर- रत्नागिरी बंद करून त्याच प्लॅटफॉर्महून दादर- गोरखपूर कायमस्वरूपी सुरू करण्यात आली आहे. दादर-रत्नागिरी उपनगरीय गाड्यांच्या संचालनाचे कारण देऊन दिवा येथे स्थलांतरित केली आहे. त्यामुळे बाहेरील गाड्यांना मुंबईत आणण्याचे प्रयत्न सूरू आहेत, पण त्याचवेळी कोकणातील रेल्वेगाडी मुंबईच्या वेशीवर थांबवली जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
advertisement
माजी रेल्वेमंत्र्यांचा संताप
माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. सुरेश प्रभु यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, या गाडीमुळे कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गैरसोय होत आहे. कारण या प्रवाशांपैकी बहुतांश जण कामगार वर्गातील असून, त्यांची मुळे कोकणात आहेत.त्यामुळे त्यांनी तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
advertisement
दरम्यान या घटनेने मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांवर मोठा अन्याय झाला आहे. त्यामुळे आता कोकणवासियांना या संदर्भात कठोरता कठोर आंदोलन छेडल्याशिवाय पर्याय नाही आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Konkan Railway : कोकणी माणसा जागा हो…! गोरखपूर एक्स्प्रेससाठी कोकणातील गाडीवर 'वरवंटा', माजी रेल्वेमंत्र्यांचाही संताप
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement