हा तर सोशल मीडियाचा चमत्कार! कर्नाटकात हरवलेला तरुण विरारला सापडला, 2 वर्षांनी झाली बाप-लेकाची भेट

Last Updated:

Social Media: सोशल मीडियावरील रिल्समुळे दोन वर्षांपूर्वी कर्नाटकातून हरवलेला तरुण विरारमध्ये सापडला आहे.

हा तर सोशल मीडियाचा चमत्कार! कर्नाटकात हरवलेला तरुण विरारला सापडला, 2 वर्षांनी झाली बाप-लेकाची भेट
हा तर सोशल मीडियाचा चमत्कार! कर्नाटकात हरवलेला तरुण विरारला सापडला, 2 वर्षांनी झाली बाप-लेकाची भेट
मुंबई: सोशल मीडियाचा उपयोग फक्त मनोरंजनासाठीच नाही, तर तो कधी कधी आयुष्यभर लक्षात राहील असा चमत्कारही घडवू शकतो. नालासोपाऱ्यात घडलेली हीच एक भावनिक घटना. फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर प्रसारित झालेल्या एका छोट्या व्हिडिओने दोन वर्षांपूर्वी हरवलेल्या एका 25 वर्षीय मनोरुग्ण तरुणाला त्याच्या कुटुंबाशी पुन्हा एकत्र आणले आहे.
नालासोपाऱ्यातील सामाजिक कार्यकर्ता यश माने हे 19 ऑक्टोबर रोजी विरार जकात नाका परिसरात रात्री मिठाई वाटत होते. त्या वेळी काही लोक एका भटक्या तरुणाला हुसकावत होते. यश यांनी पुढाकार घेत त्या तरुणाला वाचवले आणि त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट केला. काही दिवसांतच हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि कर्नाटकातील एका छोट्या गावात पोहोचला.
advertisement
हरवलेला तरुण म्हणजे सलीम बंडी
व्हिडीओ पाहताच कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील हागरीबोम्मनहल्ली गावातील खसीम बंडी यांना त्यात दिसणारा चेहरा फार ओळखीचा वाटला. नीट पाहिल्यावर ते थक्क झाले. कारण व्हिडिओतील तरुण दुसरा कोणी नसून त्यांचा मुलगा सलीम बंडी होता, जो दोन वर्षांपूर्वी घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेला होता. घरच्यांनी त्याचा शोध घेतला, पोलिसांत तक्रार दाखल केली, पण त्याचा काहीच मागमूस लागला नाही. काळाच्या ओघात सर्वांनी गृहीत धरले की सलीम कदाचित या जगात नाही. मात्र, सोशल मीडियावरील त्या एका रीलने त्यांच्या आशा पुन्हा जागवल्या.
advertisement
सोशल मीडियावरून जोडला पुन्हा धागा
खसीम यांनी इंस्टाग्रामवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधला आणि यश माने यांना आपल्या मुलाची माहिती दिली. यश यांनी त्यांना मुंबईत यायला सांगितले आणि तोपर्यंत सलीमची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. काही तासांच्या प्रवासानंतर खसीम आपल्या भावासह आणि गावकऱ्यांसह नालासोपारा येथे पोहोचले. मंगळवारी पहाटे पाच वाजता यश माने यांनी त्यांना विरार स्थानकातून घेऊन सलीम असलेल्या ठिकाणी नेले.
advertisement
दोन वर्षांनंतर बाप-लेकांचा भावनिक मिलाफ
तिथे पोहोचताच खसीम यांची नजर आपल्या मुलावर पडली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. दोन वर्षांनंतर आपल्या लेकाला पाहून त्यांनी त्याला घट्ट मिठी मारली. त्या क्षणी सलीमलाही वडिलांना ओळखल्याचा आनंद झाला आणि तोही मुलासारखा रडू लागला. या भावनिक पुनर्भेटीचा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, अनेकांनी यश माने यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
हा तर सोशल मीडियाचा चमत्कार! कर्नाटकात हरवलेला तरुण विरारला सापडला, 2 वर्षांनी झाली बाप-लेकाची भेट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement