मोठी बातमी! मुंबई लोकलला मोठा अपघात, खचाखच भरलेल्या रेल्वेतून 4 प्रवाशी पडले, एकाचा मृत्यू
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून ४ प्रवासी खाली पडले आहेत. तीन प्रवासी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेरील सीएसएमटी स्थानकावरुन गाड्या सोडत नसल्याने ऐन गर्दीच्या वेळी मोठा खोळंबा झाला.मात्र प्रशासनाने मध्यस्ती केल्यानंतर रेल्वे सुरळीत झाली. मात्र लोकल खचाखत गर्दीने भरल्या होत्या. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून ४ प्रवासी खाली पडले आहेत. तीन प्रवासी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, जखमींना जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हे प्रवासी घरी जात होते. सध्या या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेतून खाली पडलेल्यांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
advertisement
खचाखच गर्दीमुळे प्रवासी खाली पडल्याची शक्यता
जखमी प्रवाशांची प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिन्ही प्रवाशांची ओळख पटू शकली नाही. तर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू असं या घटनेची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात ट्रेनमध्ये असलेल्या खचाखच गर्दीमुळे हे प्रवासी खाली पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मध्य रेल्वेकडून अधिकृत माहिती नाही
advertisement
मस्जिद स्थानकाजवळ प्रवाशांचा अपघात झाला असून यात एका प्रवेशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेकडून अधिकृत माहिती मिळाली नाही, मात्र संध्याकाळी झालेल्या लोकल बंद आंदोलनामुळे प्रचंड गर्दी झाली आणि त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
रेल्वे मोटरमॅनच्या आंदोलनाचा मोठा फटका
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेची वाहतूक अचानक विस्कळीत झाली . ऐन गर्दीच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. परिणामी सीएसएमटीहून कसारा-कर्जत, कल्याणकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला होता. त्यामुळे घरी जाणाऱ्यांनी गर्दीच्या ट्रेनमध्ये चढण्याचा निर्णय घेतला. रेल्वे मोटरमॅनच्या आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे.
advertisement
आंदोलन का केलं होतं?
मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर लोहमार्ग पोलिसांनी दोन अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले आणि त्याच्या विरोधात रेल्वे कर्मचारी संघटनेनं आज आंदोलन केलं. हे आंदोलन आता मागे घेतलं असलं तरी त्याचा परिणाम संध्याकाळपासूनच दिसायला लागला. लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झालं असून, अनेक गाड्या उशिराने धावत आहेत, तर काही रद्द करण्यात आल्या होत्या. प्रवासी संघटनांवर देखील लोकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, गर्दीमुळे अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 7:51 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मोठी बातमी! मुंबई लोकलला मोठा अपघात, खचाखच भरलेल्या रेल्वेतून 4 प्रवाशी पडले, एकाचा मृत्यू


