advertisement

'50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयात लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, संपूर्ण VIDEO समोर

Last Updated:

मेडिकल परवाना रद्द करण्याच्या प्रकरणी राजेंद्र ढेरंगे याने 12 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात ३५ हजारांची लाच स्वीकारली होती.

News18
News18
संकेत वरक, प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या विकास कामाबद्दल ज्या मंत्रालयात निर्णय घेतले जातात त्या वास्तूमध्ये लाचखोरीचा प्रकार समोर आल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अंतर्गत विभागात हा प्रकार घडला होता. या प्रकरणी लिपिक राजू ढेरंगेला ACB ने ताब्यात घेतलं आहे. आता या लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन समोर आलं आहे.
advertisement
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या विभागात मंत्रालयामध्ये क्लर्क राजेंद्र ढेरंगेला 35 हजारांची लाच स्वीकारताना  लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी 12 फेब्रुवारीला  रंगेहाथ पकडलं होतं.  आरोपी राजेंद्र ढेरंगेनं जेव्हा लाच स्वीकारली होती. त्यावेळीचं स्टिंग ऑपरेशन व्हिडीओ समोर आला आहे. तक्रारदाराने खिश्यामध्ये कॅमेरा ठेवला होता. या कॅमेऱ्यात ढेरंगे पैशाबद्दल बोलताना कैद झाला आहे  "50 घेऊन ये आणि तुझं काम करून घेऊन जा, कधी येणार सांग मला तसं तयारीत राहावं लागेल. साहेब येतील, पुढच्या हफ्त्यात यावं लागेल" असं ठेरंगे हा या व्हिडीओमध्ये बोलत आहे.
advertisement
विशेष म्हणजे, तक्रारदार हरिराम घान जेव्हा या ढेरंगेला भेटले होते. त्यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे मंत्रालयात आपल्या केबिनमध्येच होते. या व्हिडीओमध्ये झिरवळ हे केबिनमधून बाहेर येत असल्याचं दिलं आहे.
काय आहे प्रकरण? 
मेडिकल परवाना रद्द करण्याच्या प्रकरणी राजेंद्र ढेरंगे याने 12 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात ३५ हजारांची लाच स्वीकारली होती.  ढेरंगेला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं होतं.  एसीबीची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) राजेंद्र ढेरंगेला ३५ हजारांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक केली.  लाच स्वीकारल्याचा आरोप सरकारी काम करून देण्यासाठी संबंधित रक्कम स्वीकारल्याचं आरोप असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  ढेरंगे सध्या एसीबीच्या कोठडीत आहे.
advertisement
लिंक जोडली तर राजीनामा देईन - झिरवळ
दरम्यान, या प्रकरणावर नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. "मंत्रालयातील एका क्लर्कला ट्रॅप करण्यात आलं होतं. जो प्रकार घडला तो चुकीचा होता. अनेकांनी आरोप केले की यात वरपर्यंत लिंक आहे. पण माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईल, असं नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं होतं.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
'50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयात लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, संपूर्ण VIDEO समोर
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement