Bhiwandi: महापौरपदाचा उमेदवार कसा बदलला? दोन्ही आमदारांची पडड्याआडून खेळी, भिवंडीत जोरबैठका
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
भाजपचे आमदार महेश चौघुले आणि समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्या विश्वासू आणि निकटवर्तीय असल्याने स्नेहा मेहुल पाटील यांना महापौरपदासाठी रिंगणात उतरवल्याचे सांगितले जाते.
ठाणे (भिवंडी) : भिवंडी महापालिकेत महापौरपदाची निवडणूक काही तासांवर आलेली असताना भारतीय जनता पक्षाने ऐनवेळी उमेदवार बदलल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. नारायण चौधरी यांच्याऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना पक्षाने महापौरपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. शिवसेना, समाजवादी पक्ष आणि भिवंडी विकास आघाडी अशा पक्षांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष महापौरपदाची निवडणूक जिंकेल, असा विश्वास भिवंडीचे भाजपचे शहराध्यक्ष रवी सावंत यांनी व्यक्त केला. भाजपचे आमदार महेश चौघुले आणि समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्या विश्वासू आणि निकटवर्तीय असल्याने स्नेहा मेहुल पाटील यांना महापौरपदासाठी रिंगणात उतरवल्याचे सांगितले जाते. महापौरपदाचा उमेदवार बदलण्यामागे दोन्ही आमदारांची खेळी असल्याची चर्चा आहे.
कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने छोट्या पक्षांच्या सदस्यांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे छोटे पक्ष गळाला लावण्याकरिता भाजप, काँग्रेसने शक्य तेवढे प्रयत्न केले. दुसरीकडे भाजपने ऐनवेळी महापौरपदाचा उमेदवार बदलल्याने नारायण चौधरी नाराज झाले असून त्यांचे समर्थक नगरसेवक फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. सेक्युलर फ्रंटशी चर्चा करणार असल्याचे सांगून येत्या काही तासातले इरादे त्यांनी स्पष्ट केले. परंतु आपलाच महापौर बसणार, असा दावा भाजपकडून व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे ४६ हा जादुई आकडा गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार स्नेहा मेहुल पाटील कोण आहेत?
भिवंडी निजामपूर महानगरपालिका वॉर्ड क्रमांक १६ मधून भाजपच्या स्नेहा मेहुल पाटील यांची नगरसेविका म्हणून निवड झाली. स्नेहा पाटील 2292 मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांचे सासरे सुरेश पाटील हे 25 वर्षे भिवंडीत नगरसेवकपदी राहिले. त्यांनी नगर रचना विभागाचे सभापतीपदही सांभाळले. स्नेहा पाटील यांची आई काल्हेर ग्रामपंचायतीच्या सरपंच देखील राहिल्या आहेत. एकंदर स्नेहा मेहुल पाटील यांना राजकारणाचा मोठा वारसा आहे.
advertisement
मेहुल पाटील यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून आमदार रईस शेख यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख आहे. समाजवादी पक्षाच्या अंतर्गत वादामुळे त्यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती. ऐनवेळी भाजपकडून निवडणूक लढवूनही त्यांना महापौरपदासाठी पक्षाने संधी दिली आहे.
भाजपचा महापौर कसा बसणार? भाजप शहराध्यक्षांनी गणित सांगितलं
भाजपा २२, शिवसेना १२, अपक्ष १, समाजवादी पक्ष ६, विकास आघाडी ३ आणि इतर काही नगरसेवक मिळून भिवंडीत आमचा महापौर बसवणार, असे भाजप भिवंडी शहराध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले. कोणी कोणाची भेट घेतली, कशासाठी घेतली यापेक्षा महापौर महायुतीचा बसणार हे महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
advertisement
पक्षांतर्गत संघर्षामुळे रईस शेख यांचे समाजवादी पक्षाविरोधात काम
समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षांतर्गत संघर्षामुळे भिवंडी महापालिकेत उघडपणे समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांच्या विरोधात काम केले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा जाहीर प्रचार केला. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या अनेक उमेदवारांना फटका बसला.
कोणत्या पक्षाकडे किती संख्याबळ?
काँग्रेस- ३०
भाजप- २२
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)- १२
advertisement
शिवसेना (शिंदे गट)- १२
समाजवादी पार्टी- ६
कोणार्क विकास आघाडी- ४
बहुजन विकास आघाडी-३
अपक्ष- १
Location :
Bhiwandi Nizampur,Thane,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 10:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhiwandi: महापौरपदाचा उमेदवार कसा बदलला? दोन्ही आमदारांची पडड्याआडून खेळी, भिवंडीत जोरबैठका








