advertisement

Hardeek Joshi: नवरा असावा तर असा! राणादाने अंजलीबाईंसाठी पाहिलंय 'हे' स्वप्न; "तिने मोठ्या गाडीत बसावं आणि मी..."

Last Updated:
एका पॉडकास्ट मुलाखतीमध्ये अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांच्यात नातं नक्की कसं आहे? हार्दिकचं स्वप्न काय आहे? याविषयी अभिनेत्याने मनमोकळेपणाने भाष्य केलंय.
1/6
 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेले राणा दा आणि अंजली बाईला काही विशेष ओळखीची गरज नाही. अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे ऑन स्क्रीन लाईफ पार्टनर असलेलं कपल रिअल लाईफमध्येही लाईफ पार्टनर आहे. सध्या हे कपल एका मुलाखतीमुळे चर्चेत आलं आहे.

2/6
 अभिनेता हार्दिक जोशीने अलीकडेच, मित्र म्हणेला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये हार्दिक आणि अक्षया यांच्यात नातं नेमकं कसं आहे? आणि हार्दिकचं काय स्वप्न आहे? याबद्दल भाष्य केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता कोणत्याही प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला आलेला नाही. चाहते त्याच्या अपकमिंग प्रोजेक्टसाठी उत्सुक आहेत.

3/6
 मुलाखतीमध्ये हार्दिकने त्याचं आणि अक्षयातल्या नात्याबद्दल सांगितले की, "माझं एकच मत आहे, मला तिला कायमच खूप मोठं झालेलं पाहायचंय. म्हणजे, तिची जी इच्छा आहे, तिला काहीही व्हायचं असेल, प्रोड्युसर व्हायचं असेल तर प्रोड्युसर, दिग्दर्शिका व्हायचं असेल तर दिग्दर्शिका, पण मला असं वाटतं की, ती खूप मोठी कलाकार आहे. खरंतर ती, माझ्यापेक्षा चांगली कलाकार आहे."

4/6
 "तिच्यामध्ये ती कॅपेब्लिटी आहे, की ती एखादा शो असेल किंवा सिनेमा असेल, तर ती तो करू शकेल. तिच्याकडे मॅनेजमेंट स्किल्स खूप चांगल्या आहेत. " सोबतच, हार्दिकने अक्षयासोबतची एक ड्रीम सुद्धा शेअर केलेली आहे, तो म्हणाला, "माझी एक ड्रीम आहे, आमची खूप मोठी अशी एक गाडी असावी, त्यात ती मागे एकटी बसावी आणि मी ती गाडी ड्राईव्ह करावी."

5/6
 "मला ती म्हणाली, तू गाडी वैगेरे घेशीलच, पण मी तिला नाही म्हणालो. ती गाडी तुझ्या नावावर असणार आहे आणि ती गाडी तू घ्यायची आहेस. पण ती गाडी मी चालवणार आहे आणि तू मागे बसायचं आहेस. असं आमचं स्वप्न आहे. मला ते स्वप्न लवकरात लवकर सत्यात उतरावायचं आहे."

6/6
 अक्षया आणि हार्दिकने डिसेंबर 2022 साली पुण्यामध्ये लग्नगाठ बांधली. लग्नापासून हार्दिक आणि अक्षया दोघेही फार कोणत्याही प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले नाहीत. या दोघांचाही अपकमिंग सिनेमा कोणता असेल? याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement