advertisement

Watch: योगेश्वरीला कल्पना नव्हती लंच ब्रेकमध्ये तिच्यासोबत असं काही होईल, अवघ्या एका सेकंदाचा चुकीचा अंदाज अन् खेळ खल्लास

Last Updated:

बेंगळुरूच्या राजाजीनगरमध्ये दुपारच्या जेवणासाठी रस्ता ओलांडताना 27 वर्षीय बँक कर्मचाऱ्येला भरधाव मोटारसायकलने धडक दिली, ज्यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी निष्काळजी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News18
News18
बेंगळुरू: शहरातील राजाजीनगर परिसरात सोमवारी दुपारच्या जेवणासाठी बाहेर पडलेली 27 वर्षीय बँक कर्मचारी भीषण अपघातात मृत्यूमुखी पडली. वेगाने येणाऱ्या मोटारसायकलने तिला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली होती आणि उपचारादरम्यान काही तासांनी तिचा मृत्यू झाला.
मृत तरुणीचे नाव योगेश्वरी असे असून ती लग्गेरे येथील केम्पेगौडा लेआउटची रहिवासी होती. ती डॉ. राजकुमार रोडवरील एका खासगी बँकेत कार्यरत होती. दररोजप्रमाणे सोमवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास ती आपल्या सहकाऱ्यांसह बँकेसमोरील हॉटेलमधून जेवण घेण्यासाठी रस्ता ओलांडत होती. पोलिसांच्या माहितीनुसार योगेश्वरी हातात जेवणाचा डबा घेऊन रस्ता पार करत असताना वेगाने येणाऱ्या बुलेट मोटारसायकलने तिला जोरदार धडक दिली.
advertisement
ही मोटारसायकल 21 वर्षीय दीपक (राहणार उल्सूर) चालवत होता. तो विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले. योगेश्वरी आणि तिचे सहकारी नेहमीच त्या हॉटेलमधून जेवण घेत असत. सोमवारीही ती रस्ता ओलांडत असताना दीपक वेगात मोटारसायकल चालवत आला आणि तिच्यावर धडकला.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यांनुसार अपघाताआधी काही क्षणांचा चुकीचा अंदाज या दुर्घटनेला कारणीभूत ठरली. योगेश्वरीसोबत रस्ता ओलांडणाऱ्या एका सहकाऱ्याने येणारी मोटारसायकल पाहून मधेच थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र योगेश्वरीने आपण सुरक्षितपणे रस्ता पार करू शकू, असा अंदाज घेत पुढे पाऊल टाकले आणि तोच निर्णय तिच्यासाठी घातक ठरला.
advertisement
advertisement
धडकेच्या तीव्रतेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. योगेश्वरीला डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर दीपकलाही डोक्याला मार लागला. दोघांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्न केले मात्र सायंकाळी सुमारे 9 वाजता योगेश्वरीला मृत घोषित करण्यात आले.
दीपक सध्या रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते. राजाजीनगर वाहतूक पोलिस ठाण्यात दीपकविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू घडवून आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
पोलिसांनी सांगितले की, दीपकची प्रकृती सुधारल्यानंतर त्याचा जबाब नोंदवला जाईल. त्यानंतर पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाईल. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव वाहनचालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Watch: योगेश्वरीला कल्पना नव्हती लंच ब्रेकमध्ये तिच्यासोबत असं काही होईल, अवघ्या एका सेकंदाचा चुकीचा अंदाज अन् खेळ खल्लास
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement