advertisement

Crime News : सावरण्यापूर्वीच पुन्हा कोसळलं आभाळ! महिलेने लग्नाचा घाट घातला अन्...; मुंबईतील घटना

Last Updated:

Mumbai Crime News: मुंबईतील एका महिलेला मॅट्रिमोनियल वेबसाइटवर नोंदणी करणं अतिशय महागात पडले आहे. जिथे थेट प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले आहे.

News18
News18
मुंबई : घटस्फोटानंतर आयुष्य पुन्हा उभं करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलुंडच्या एका महिलेची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाह जुळविणाऱ्या वेबसाइटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवत महिलेकडून तब्बल 17 लाख रुपये उकळले.
घटस्फोटानंतर आयुष्य पुन्हा उभं करणार होती
मुलुंड पूर्व येथे राहणारी एक महिला जी ग्राफिक डिझायनर आहे. 2012 साली तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती मानसिक तणावातून जात होती. कुटुंबीयांच्या आग्रहामुळे तिने पुन्हा लग्नाचा विचार केला आणि काही वर्षांपूर्वी एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवर नोंदणी केली.
इथंच घात झाला
सप्टेंबर 2023 मध्ये विराज भोसले नावाच्या व्यक्तीने तिला संपर्क केला. स्वतःचे प्रोफाइल विश्वासार्ह भासवण्यासाठी त्याने वडील आयपीएस अधिकारी असल्याचे तसेच आई-बहीण परदेशात असल्याचे सांगितले. सामाजिक कार्य, राजकीय ओळखी आणि स्वयंसेवी संस्थेची माहिती देत त्याने तिचा विश्वास संपादन केला.
advertisement
घटस्फोटित महिलांना स्वस्त घराचे आश्वासन
काही काळानंतर विराजने सरकारी निर्भया फंडाच्या माध्यमातून घटस्फोटित महिलांना स्वस्तात घर मिळवून देता येते असा दावा केला. त्यासाठी बँक कर्ज घ्यावे लागेल असे सांगून तिला 17 लाखांचे वैयक्तिक कर्ज काढायला लावले. ही रक्कम त्याने स्वतःकडे घेतली.
मात्र पैसे दिल्यानंतर अनेक दिवस घराबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. विराज टाळाटाळ करू लागल्याने तिला संशय आला. पैसे परत मागितल्यावर त्याने धमकावण्याचा प्रयत्न केला. अखेर तिने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Crime News : सावरण्यापूर्वीच पुन्हा कोसळलं आभाळ! महिलेने लग्नाचा घाट घातला अन्...; मुंबईतील घटना
Next Article
advertisement
BMC News: मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दंड!
मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दं
  • महापालिकेची तिजोरी रिकामी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू असताना

  • आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

  • पार्किंग कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे तब्बल ५५ कोटींच्या नुकसान भरपाईची माग

View All
advertisement