MHADA Lottery: म्हाडाच्या घरासाठी पात्रता काय? अर्ज कसा करायचा? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Last Updated:

MHADA Lottery: म्हाडाच्या कोकण मंडळातील 5 हजार 285 घरांसाठी सोडत योजना जाहीर झाली असून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊ.

MHADA Lottery: म्हाडाच्या घरासाठी पात्रता काय? अर्ज कसा करायचा? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
MHADA Lottery: म्हाडाच्या घरासाठी पात्रता काय? अर्ज कसा करायचा? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा ही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांच्या विकास, पनर्बांधणी आणि झोपडपट्टी पुनर्विकासासाठी नोडल एजन्सी आहे. नुकतेच म्हाडाच्या कोकण विभागाने 5 हजार 285 घरांसाठी आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत योजना जाहीर केलीये. सोमवारी, 14 जुलैपासून ठाणे ते ओरोसपर्यंत असणाऱ्या या घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे म्हाडासाठी अर्ज कसा भरायचा? त्यासाठी वयोमर्यादा काय? अर्ज भरताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे? याबाबत जाणून घेऊयात.
अर्जदारासाठी पात्रता काय?
म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करताना अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र आणि पॅनकार्ड असणे आवश्यक आहे. तसेच उत्पन्नाचा दाखला, बँक खाते तपशील, पासपोर्ट आकाराचे फोटो ही कागदपत्रे अर्ज करताना असणे गरजेचे आहे.
advertisement
उत्पन्नानुसार कोणत्या घरासाठी अर्ज करता येईल?
अर्जदाराचे मासिक उत्पन्न 25,001 ते 50,000 रुपयांपर्यंत असेल तर ती व्यक्ती लोअर इन्कम ग्रुप (एलआयजी) सदनिकांसाठी अर्ज करू शकतो.
अर्जदाराचे मासिक उत्पन्न 50,001 ते 75,000 च्या दरम्यान असेल त्यांना मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) सदनिकांसाठी अर्ज करता येईल.
अर्जदाराचे मासिक उत्पन्न 75,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास (एचआयजी) सदनिकांसाठी अर्ज करू शकतात.
advertisement
अर्ज कसा भरायचा?
म्हाडा लॉटरी 2025 चा अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी, म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ‘रजिस्टर’ वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला युजरनेमच्या फॉर्मसाठी निर्देश दिले जातील. त्यानुसार युजरनेम नाव निवडा आणि पासवर्ड तयार करुन दिलेल्या जागेवर भरा. पुढे दिलेली तुमची सर्व माहिती भरा. कागदपत्रे अपलोड करून तुमची पसंतीची पेमेंट पद्धत निवडा. शेवटी फॉर्म सबमिट करा. सबमीटच्या आधी तुम्हाला तेथे तुमचा मोबाइल नंबर विचारला जाईल, जो भविष्यातील संपर्कासाठी वापरण्यात येईल.
advertisement
म्हाडा लॉटरी फॉर्मवर आपण सर्व माहिती भरल्यानंतर, पुष्टीवर क्लिक करा. म्हाडा लॉटरी फॉर्मवर प्रविष्ट केलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी केली जाईल. अशाप्रकारे तुम्ही म्हाडा लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्ज सबमिट करू शकता. तसेच अर्ज सबमिट झाल्यानंतर संदर्भ क्रमांकासह पावती जतन करण्याचे लक्षात ठेवा.
कोकण विभाग लॉटरी 2025 चे वेळापत्रक
14 जुलैपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू.
advertisement
13 ऑगस्ट : रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे.
14 ऑगस्ट : रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करू शकतील. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील.
21 ऑगस्ट : सायंकाळी 6 वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी  प्रसिद्ध होईल.
25 ऑगस्ट :  सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रारूप यादीवर दावे व हरकती नोंदविता येणार आहेत.
advertisement
1 सप्टेंबर : सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी सायंकाळी 6 वाजता  प्रसिद्ध होईल.
3 सप्टेंबर : सकाळी १० वाजता  पात्र अर्जाची संगणकीय सोडत ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाईल.
मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery: म्हाडाच्या घरासाठी पात्रता काय? अर्ज कसा करायचा? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement