Mhada ची घरं घेण्याची मोठी संधी, लगेच होणार विक्री, अर्ज प्रक्रियेला सुरुवात
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
मुंबई: मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील 84 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजेपासून प्रारंभ होणार आहे.
सदर लिलावात मुंबईतील मुलुंड गव्हाणपाडा येथे 04 अनिवासी गाळे, कुर्ला- स्वदेशी मिल येथे 05, कोपरी पवई येथे 15, मॉडेल टाऊन मजासवाडी जोगेश्वरी पूर्व येथे 01, सिद्धार्थ नगर गोरेगाव येथे 01, बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व येथे 17 अनिवासी गाळे, मालवणी मालाड येथे 29 अनिवासी गाळे, चारकोप येथे 12 अनिवासी गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
advertisement
दि. 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजेपासून सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली स्वरूपातील ई-लिलाव www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळावर होणार आहे. दि. 24 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता https://eauction.mhada.gov.in आणि https://mhada.gov.in या दोन्ही संकेतस्थळांवर ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई मंडळातील अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाईन भरणे यासाठी दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजेपासून ते दि. 21 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
advertisement
ई- लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय ई- लिलावासाठी अर्ज करते वेळी 18 वर्षापेक्षा जास्त असावे, अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील सन 2018 नंतर काढलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असून ऑफसेट किंमतीनुसार विहित अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे.
लिलावाबद्दलची विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक गाळ्याचे विवरण, सामाजिक आरक्षण आणि अर्ज करण्याची कार्यपद्धती, सविस्तर अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज सूचना, माहिती पुस्तिका याबाबतची माहिती https://eauction.mhada.gov.in आणि https://mhada.gov.in या संकेतस्थळावरील Lottery> Eauction> eauction या पोर्टलवर उपलब्ध आहे. अर्जदाराने संकेतस्थळावरील व माहिती पुस्तिकेतील सविस्तर सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 7:45 PM IST


