MHADA Lottery 2025: अर्ज करा अन् घर मिळवा, म्हाडाची मुंबईकरांसाठी भन्नाट योजना, लॉटरीशिवाय मिळणार घर

Last Updated:

MHADA Lottery 2025: म्हाडाने घरांसाठीच्या अनेक अटी शिथिल केल्या आहेत. ज्यामुळे घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. विशेष म्हणजे उत्पन्न गटाची मर्यादा नाही.

MHADA Lottery 2025: अर्ज करा अन् घर मिळवा, म्हाडाची मुंबईकरांसाठी भन्नाट योजना, लॉटरीशिवाय मिळणार घर
MHADA Lottery 2025: अर्ज करा अन् घर मिळवा, म्हाडाची मुंबईकरांसाठी भन्नाट योजना, लॉटरीशिवाय मिळणार घर
मुंबई: मुंबईकरांसाठी म्हाडाकडून गुड न्यूज आहे. आता म्हाडाच्या मुंबई मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. जी घरे दोन किंवा अधिक वेळा सोडतीनंतरही विकली गेली नाहीत, ती घरे आता ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे घर आहे त्यांनाही आता म्हाडाचं घर मिळणार आहे.
मुंबई मंडळाने सध्या सुमारे 100 घरे ओळखली असून, या घरांच्या विक्रीसाठी पुढील 10 दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर थेट विक्री प्रक्रियेला सुरुवात होईल. यामध्ये सर्वात विशेष बाब म्हणजे या घरांसाठी कोणतीही सोडत काढली जाणार नाही. जो पहिला अर्ज करेल आणि अनामत रक्कम भरेल, त्यालाच घराचे वाटप केले जाईल. म्हाडाने या प्रक्रियेत अनेक अटी शिथिल केल्या आहेत, त्यामुळे इच्छुकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
महागड्या घरांना मिळणार प्रतिसाद
म्हाडाच्या मुंबई मंडळातील ताडदेव आणि पवईतील घरांना आतापर्यंत कमी प्रतिसाद मिळाला होता. ताडदेवमधील ‘क्रिसेंट टॉवर’ प्रकल्पातील सुमारे सात कोटी किंमतीची सात घरे अजूनही विकली गेलेली नाहीत. तसेच, पवईतील तुंगा परिसरातील मध्यम आणि उच्च गटातील एक ते दीड कोटींची घरे देखील उपलब्ध आहेत. अॅन्टॉप हिलमधील अल्प उत्पन्न गटातील घरांचाही या योजनेत समावेश होईल.
advertisement
घर खरेदीसाठी शिथिल केलेल्या अटी
म्हाडाने या योजनेतून अनेक अटी शिथिल केल्या आहेत, ज्यामुळे घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. विशेष म्हणजे उत्पन्न गटाची मर्यादा नाही. कोणत्याही उत्पन्नगटातील नागरिक अर्ज करू शकतात. प्राप्तिकर विवरणपत्र वा दाखला आवश्यक नाही. घर घेण्यासाठी करदात्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार नाही.
घर खरेदीसाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेत घर घेण्यासाठी फारशा अटी ठेवण्यात आलेल्या नाहीत. उत्पन्न गटाची मर्यादा नाही आणि प्राप्तिकर विवरणपत्र किंवा दाखला देणे बंधनकारक नाही. केवळ आधारकार्ड, पॅनकार्ड आणि निवासाचा पुरावा एवढीच कागदपत्रे आवश्यक असतील.
advertisement
म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या नव्या ‘प्रथम प्राधान्य’ विक्री योजनेमुळे मुंबईतील रिक्त घरे लवकर विकली जातील आणि सामान्य मुंबईकरांना स्वमालकीच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
MHADA Lottery 2025: अर्ज करा अन् घर मिळवा, म्हाडाची मुंबईकरांसाठी भन्नाट योजना, लॉटरीशिवाय मिळणार घर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement