mlc election 2024: विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लावली फिल्डिंग, असा आखला प्लॅन!
- Published by:sachin Salve
Last Updated:
विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी मास्टर प्लान तयार केला आहे.
उदय जाधव, प्रतिनिधी
मुंबई: विधान परिषद निवडणुकीसाठी घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. सर्व आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या सर्व 9 उमेदवारांना निवडून आणण्याची सूत्रं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणार आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी मास्टर प्लान तयार केला आहे. या निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ उमेदवारांना विजयी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक रणनिती तयार केल्याचं सांगितलं जात आहे. महायुतीमधील शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सर्व घटक पक्ष आणि समर्थक अपक्ष आमदारांची एकत्र मोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांधली.
advertisement
महायुतीमधील तीन प्रमुख पक्षांच्या अंतर्गत बैठका पार पडल्यानंतर सर्व मतदार आमदारांचे विजयी गणित मांडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक चाली रचल्या आहेत. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, महायुतीमधील पक्ष, घटक पक्ष आणि समर्थक अपक्ष आमदारांशी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपर्क ठेवून आहेत.
advertisement
महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीचे निर्णायक मतं त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कोणाला द्यायची याची सांख्यिकी रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवली आहे.
विशेष म्हणजे, मागील विधान परिषद निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दमदार खेळी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला होता. एवढंच नाहीतर राज्यसभा निवडणुकीतही फडणवीस यांनी अशी रणनीती आखली होती. त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची मतं सुद्धा फुटली होती. त्यामुळे या निवडणुकीत महायुती काय खेळी करणार हे पाहण्याचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 10, 2024 3:29 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
mlc election 2024: विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लावली फिल्डिंग, असा आखला प्लॅन!