पोराने केले कांड, बापाने गमावलं पद; मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशावरून शिवसेनेनं केली कारवाई

Last Updated:

हिट अँड रन प्रकरणावरून आरोप झाल्यानंतर शिवसेना पक्षाकडून राजेश शाह यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

News18
News18
मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीऱ शहा याच्या वडिलांवर शिवसेना शिंदे गटाने कारवाई केलीय. मिहीर शाहचे वडील राजेश शाह हे शिवसेना उपनेते होते. हिट अँड रन प्रकरणावरून आरोप झाल्यानंतर शिवसेना पक्षाकडून राजेश शाह यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. शिवसेना मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलीय. सोमवारी वरळीत दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला मिहीर शाह याच्या बीएमडब्ल्यू कारने उडवलं होतं. त्यानंतर महिलेला दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं होतं. यात महिलेचा मृत्यू झाला होता.
मिहीर शाह वरळीतील अपघातानंतर फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला शहापूरच्या माशाअल्ला रिसॉर्टमधून अटक केली आहे. त्याच्यासोबत या रिसॉर्टमध्ये आणखी 12 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्या या 12 जणांमध्ये मिहीर शाहची आई आणि बहिणीचा देखील समावेश आहे. या सर्वांनी मिहीर शाहला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
advertisement
वरळी हिट अँड रन प्रकरणी प्रमुख आरोपी मिहीर शाह याला मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. मिहीर शाह घटनेआधी जुहूत ज्या बारमध्ये गेला होता त्या बारवर मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. बीएमसीने बारचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलंय. हिट अँड रन घटनेनंतर बीएमसीने बारवर धाड टाकली. यात ग्लोबल तापस बारचे काही बांधकाम अनधिकृत असल्याचं आढळून आलं. त्यानंतर कारवाई करत जेसीबीने बांधकाम तोडून टाकण्यात आले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
पोराने केले कांड, बापाने गमावलं पद; मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशावरून शिवसेनेनं केली कारवाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement