Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 18 तासांसाठी या भागात पाणीपुरवठा राहणार बंद, कारण काय?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत 21 ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत 21 ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहरातील मुलुंड (पश्चिम) परिसरात पाणीपुरवठा 18 तासांसाठी बंद राहणार आहे. या दिवशी सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत 18 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार असून येथील रहिवाशांनी गुरुवारी पाणी जपून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्यावरील (जीएमएलआर) पुलाच्या कामामुळे 1 हजार 200 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या टी विभागामध्ये मॅरेथॉन मॅक्सिमा इमारत ते तानसा पुलादरम्यान रस्त्यालगत असणारी जलवाहिनी वळवण्यात येणार आहे. तर दोन्ही ठिकाणी जलवाहिनी जोडण्याचे काम गुरुवारी 21 ऑगस्ट पासून शुक्रवारी पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
advertisement
या कामकाजादरम्यान टी विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा 18 तास बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
view commentsगोरेगाव-मुलुंड रस्त्यालगतचा परिसर मुलुंड (पश्चिम) लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, जवाहरलाल नेहरू मार्ग, देवयालय मार्ग, क्षेपणभूमी, डॉ. आर.पी. मार्ग, पी.के. मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग, एन.एस. मार्ग, आर.एच.बी. मार्ग, वालजी वाडा मार्ग, व्ही.पी. मार्ग, मदन मोहन मालविया मार्ग, एसिसी मार्ग, बी.आर. मार्ग, गोशाळा मार्ग, नाहूर गाव या ठिकाणी पाणीपुरवठा बंद असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 9:28 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 18 तासांसाठी या भागात पाणीपुरवठा राहणार बंद, कारण काय?


