advertisement

Mumbai News : रहिवाशांना घराच्या खिडक्याही उघडता येईना; म्युझिकल रोडचा प्रयोग फसला?; BMC ने घेतला मोठा निर्णय

Last Updated:

Mumbai Musical Road : मुंबई कोस्टल रोडवरील म्युझिकल रोडमुळे निर्माण होणाऱ्या आवाजामुळे परिसरातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. सतत येणाऱ्या तक्रारीनंतर अखेर मुंबई महापालिकेने या समस्येची दखल घेत निर्णय घेतला असून लवकरच उपाययोजना करण्याची तयारी सुरू आहे.

Mumbai Coastal Road musical road complaints by residents
Mumbai Coastal Road musical road complaints by residents
मुंबई : मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यापैकी अलीकडे चर्चेत आलेला प्रकल्प म्हणजे म्युझिकल रोड होय. मात्र सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच हा मार्ग वादाच्या भोवऱ्यात सापडला. त्यामुळे आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कोस्टल रोडवरील 'म्युझिकल रोड'चा प्रयोग वादात
मुंबई शहरातील प्रसिद्द कोस्टल रोडवर हा उपक्रम 11 फेब्रुवारी रोजी सुरु करण्यात आलेला होता. ज्यात काही ठाराविक पट्ट्यावर जर 60 ते 70 किती प्रतितास वेगाने वाहन गेल्यास त्या ऑस्करविजेच्या जय हो गाण्याची धून ऐकू येते.
मात्र हा उपक्रम सुरु करण्याच्या काही तासांतच जवळ वास्तव्यास असलेल्या रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरु लागला. त्यांनतर तब्बल 650 कुटुंबियांनी स्वाक्षरी करुन मुंबई महापालिका आयुक्तांकडे रोडवरील संगीत बंद करण्याची मागणी केलेली होती.
advertisement
कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय?
मुंबई महापालिका आयुक्तांकडे रोडवरील संगीत बंद करण्याची मागणी केलेली होती, ज्यात अतिशय गंभीर मुद्दे नागरिकांनी मांडले होते. मुख्य म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत ही रस्त्यावरील जय हो ची धून वाजत असत. ज्यामुळे परिसरातील शांतता पूर्णपणे भंग होत होती. शिवाय त्यामुळे घराच्या खिडक्याही उघड्या पण ठेवता येत नव्हत्या. महत्त्वाचे म्हणजे त्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि शालेय विद्यार्थ्यांच्या झोपेवर परिणाम होत होता अशा अनेक समस्या ज्यात नोंदवल्या होत्या.
advertisement
पालिकेने कोणते पाऊल उचलले?
कोस्टल रोडवरील संगीताबाबत तक्रारी आल्यानंतर बृहमुंबई महानगरपालिकेने दखल घेतली आणि पालिकेने संबंधित असलेल्या कंत्राटदाराला तसेच तांत्रिक सल्लागाराला या परिसरातील डेसिबल मोजण्याचे आदेश दिलेले आहेत. एवढेच नाही तर या परिसरातील नागरिकांनी कोणताही त्रास न होता हा प्रकल्प कसा सुरु राहिल किंवा अजून काय बदल करता येईल याबाबतचाही अभ्यास आता यात केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : रहिवाशांना घराच्या खिडक्याही उघडता येईना; म्युझिकल रोडचा प्रयोग फसला?; BMC ने घेतला मोठा निर्णय
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement