Bhandup Crime: एक क्षणाचा राग, आयुष्यभराची शिक्षा! मित्रानेच घेतला मित्राचा जीव, धक्कादायक कारण समोर
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Bhandup Crime News: भांडूपमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय हर्ष ठाकूर या तरूणाची त्याच्या एका मित्राने धारदार आणि तीक्ष्ण हत्याराने काही क्षुल्लक कारणावरून हत्या केली आहे.
मुंबई: भांडूपमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काही क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात मित्राने मित्राची हत्या केली आहे. भांडूपमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय हर्ष ठाकूर या तरूणाची त्याच्या एका मित्राने धारदार आणि तीक्ष्ण हत्याराने हत्या केली आहे. या हल्ल्यामध्ये 23 वर्षीय हर्षचे प्राण गेले आहेत. रूग्णालयात उपचाराआधीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. कांजूरमार्ग पोलिसांनी आरोपीच्या जालन्यातून मुसक्या आवळल्या आहेत. हर्षच्या मित्राने त्याची रागाच्या भरामध्ये हत्या करून तो जालन्याला पळून गेला. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला 36 तासांमध्ये अटक केली आहे.
शनिवारी (14 फेब्रुवारी) मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास हर्ष ठाकूर, त्याचा मित्र रोहित खरात, ओमकार आणि नितीनसोबत एकत्र होता. भांडूप रेल्वे स्टेशनच्या शेजारी असलेल्या मेनन कॉलेजच्या इथे असलेल्या नाल्याजवळ हे चौघेही गप्पा मारत होते. गप्पा मारत असताना काही क्षुल्लक कारणावरून हर्ष आणि रोहितमध्ये वादावादी झाली. या वादाचे रूपांतर पुढे मारामारीमध्ये झाले. मारामारी करत असताना त्यांनी एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. त्यांच्यातील शाब्दिक बाचाबाची थेट हल्ल्यापर्यंत गेली. रागाच्या भरात रोहितने हर्षवर त्याच्याकडे असलेल्या तीक्ष्ण हत्याराने हत्याच केली.
advertisement
रोहितने हर्षच्या पोटावर आणि छातीवर गंभीर दुखापत केली. या हल्ल्यामध्ये हर्ष गंभीर जखमी झाला होता. या हल्ल्यानंतर रोहित तिथून पळून गेला, तो थेट जालन्यालाच निघून गेला. हल्ल्यानंतर रोहित पळून गेल्यानंतर त्याच्या इतर दोन मित्रांनी त्याला लगेचच मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण त्याला उपचाराअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलिसांना कळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. लगेचच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी रोहित खरात याचा शोध घेतला. कांजूरमार्ग पोलिसांनी रोहितला जालन्याच्या बदनापूरमधून अटक केली आहे. त्याला येत्या शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
advertisement
कांजूरमार्ग पोलिसांनी रोहितला हत्येचं कारण विचारलं असता, त्याने सांगितलं की, अचानक झालेल्या भांडणाच्या रागामध्ये, हर्षची धारदार आणि तीक्ष्ण हत्याराने हत्या केल्याचे सांगितले. माझी हर्षची हत्या करण्याचा कोणताही मानस नव्हता. माझा माझ्या रागावर नियंत्रण न राहिल्यामुळे माझ्या हातून हर्षची हत्या झाली, अशी प्रतिक्रिया रोहितने पोलिसांना दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 4:26 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Bhandup Crime: एक क्षणाचा राग, आयुष्यभराची शिक्षा! मित्रानेच घेतला मित्राचा जीव, धक्कादायक कारण समोर








