BMC Election Result: बाप मुंबईला जेवण द्यायचा, पोरगा आता मुंबईचा कारभार हाकणार! डबेवाल्याचा मुलगा नगरसेवक

Last Updated:

BMC Election Result Success story: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत डबेवाल्यांचा मुलगा मंगेश दत्ताराम पांगारे विजयी झाला असून कष्टकरी वर्गाचा आवाज सभागृहात पोहोचणार आहे.

News18
News18
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून जशी लोकलची ओळख आहे तशीच ओळख किंबहुना त्याहून अगदी जुनी ओळख ही मुंबईच्या डबेवाल्यांची आहे. मुंबईकरांची भुक भागवणारे आणि वेळेत डबे पोहोचवणाऱ्या याच डेबवाल्यांचा मुलगा चक्क मुंबई महानगरपालिकेत बसणार आहे. मुलाच्या निमित्ताने डबेवाले आज पुन्हा चर्चेत आले आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून एका सामान्य डबेवाल्याचा मुलगा मंगेश दत्ताराम पांगारे यांनी विजय मिळवला आहे. कोणतीही राजकीय बॅगराउंड नसताना त्याने हे यश मिळवलं असून तो आता मुंबई महानगरपालिकेत जाणार आहे. या निकालाने प्रस्थापित राजकारण्यांना धक्का बसला असून सामान्यांच्या पोराचा विजय सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
सफेद टोपी आणि विजयाचा गुलाल
मंगेश पांगारे यांचे वडील दत्ताराम पांगारे यांनी आयुष्यभर मुंबईकरांना वेळेवर जेवण पोहोचवण्याचे काम केलं. आज त्यांचाच मुलगा मुंबईच्या कारभारात आपला वाटा उचलणार असल्याने डबेवाल्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. निकाल जाहीर होताच निवडणूक केंद्राबाहेर शेकडो डबेवाल्यांनी एकत्र येत पांढऱ्या टोप्या हवेत उडवून आणि गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. "आज आमच्या घरातला पोरगा नगरसेवक झाला," अशी भावना यावेळी अनेक डबेवाल्यांनी व्यक्त केली.
advertisement
सामान्यांच्या संघर्षाची पावती
कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना, केवळ जनसंपर्क आणि वडिलांनी कमावलेली प्रामाणिकपणाची शिदोरी यांच्या जोरावर मंगेश यांनी ही लढाई जिंकली आहे. प्रभाग ४ मधील मतदारांनी एका उच्चशिक्षित आणि सामान्य कुटुंबातील चेहऱ्याला पसंती दिल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे. विजयानंतर मंगेश पांगारे यांनी आपल्या वडिलांच्या चरणी नतमस्तक होत हा विजय मुंबईच्या कष्टकऱ्यांचा असल्याचे सांगितले.
advertisement
मुंबईच्या सभागृहात आता डबेवाल्याचा आवाज
आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेत आतापर्यंत बड्या राजकारण्यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, मंगेश पांगारे यांच्या विजयामुळे झोपडपट्टी, मध्यमवर्गीय चाळी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडणारा एक अस्सल मुंबईकर प्रतिनिधी सभागृहात पोहोचला आहे. हा केवळ एका जागेचा विजय नसून, मुंबईच्या गल्लीबोळात घाम गाळणाऱ्या प्रत्येक कष्टकऱ्याचा सन्मान असल्याची भावना डबेवाले संघटनेने व्यक्त केली आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election Result: बाप मुंबईला जेवण द्यायचा, पोरगा आता मुंबईचा कारभार हाकणार! डबेवाल्याचा मुलगा नगरसेवक
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement