पंकजा मुंडेंच्या PA च्या अटकेनंतर डॉक्टर गौरीच्या वडिलांनी घेतली आणखी दोन नावं, अनंत गर्जेचा होणार खेळ खल्लास!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mumbai Crime News : तक्रारीनुसार डॉ. गौरी पालवे यांच्यासोबत तीन व्यक्ती अनंत गर्जे, अजय गर्जे आणि शितल आंधळे हे त्यांच्या मृत्यूपूर्वी सतत संपर्कात होते, असं गौरीच्या वडिलांनी म्हटलं आहे.
Dr Gauri Garge Death Case (विजय वंजारा, प्रतिनिधी) : राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वकीय सहाय्यक म्हणजेच पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती. पेशाने डॉक्टर असलेल्या गौरी यांनी नवऱ्यासोबत झालेल्या भांडणानंतर टोकाचं पाऊल उचललं होतं. डॉ. गौरी पालवे यांच्या मृत्यूबाबत गंभीर शंका व्यक्त करत नातेवाईकांनी वरळी येथील असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस कार्यालयात लेखी निवेदन सादर केले आहे. अर्जदार अशोक मारुती पालवे आणि त्यांची पत्नी अलकनंदा अशोक पालवे यांनी दिलेल्या तक्रारीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे पोलिसांनी लक्ष द्यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.
गौरीच्या वडिलांनी लिहिलेल्या अर्जात काय म्हटलंय?
तक्रारीनुसार डॉ. गौरी पालवे यांच्यासोबत तीन व्यक्ती अनंत गर्जे, अजय गर्जे आणि शितल आंधळे हे त्यांच्या मृत्यूपूर्वी सतत संपर्कात होते. या तिघांकडून मानसिक छळ होत असल्याची शक्यता तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. घटनेनंतर या तिघांनी आपापले मोबाईल फोन अचानक ऑफ केल्याने संशय अधिक वाढला असून, त्यांची चौकशी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
advertisement
अजय गर्जे आणि शितल आंधळे अजूनही मोकाट
आरोपपत्रात उल्लेख असलेल्या अजय गर्जे आणि शितल आंधळे यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. अजय गर्जे आणि शितल आंधळे दोघंही अजूनही मोकाट आहेत. त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी गौरीच्या वडिलांनी केली आहे.
CCTV फुटेज तपासा
दरम्यान, डॉ. गौरी यांच्या मृत्यूच्या दिवशी 22 नोव्हेंबर सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत त्या राहत असलेल्या इमारतीतील लिफ्ट, जिना आणि मुख्य प्रवेशद्वार येथील CCTV फुटेज जप्त करून तपासात समाविष्ट करण्याची विनंती अर्जदारांनी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून नातेवाईकांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 1:36 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
पंकजा मुंडेंच्या PA च्या अटकेनंतर डॉक्टर गौरीच्या वडिलांनी घेतली आणखी दोन नावं, अनंत गर्जेचा होणार खेळ खल्लास!


