झेंडूला सोन्याचं मोल! दसऱ्यामुळे मुंबईतील फूल बाजारात तेजी, किती मिळतोय भाव?
- Published by:News18 Marathi
- Reported by:PRATIKESH PATIL
Last Updated:
दसरा या सणाला गोंड्याच्या फुलांचा आणि आपट्याच्या पानांचा एक वेगळा मान असतो. त्यामुळे मुंबईतील फूल बाजारात झेंडूच्या फुलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
प्रतिकेश पाटील, प्रतिनिधी
मुंबई: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर फुलांच्या खरेदीसाठी मुंबईतील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या दादर आणि भुलेश्वर फुल मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी होते. दसरा सणात गोंडाच्या (झेंडू) फुलांना विशेष मागणी असल्याने या फुलांची मोठी आवक झाली आहे. तसेच या फुलांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. नेमकी ही दरवाढ का आणि किती झाली आहे? याबाबत जाणून घेऊ.
advertisement
दसरा या सणाला गोंड्याच्या फुलांचा आणि आपट्याच्या पानांचा एक वेगळा मान असतो. त्यामुळे यंदाही दसऱ्याच्या निमित्ताने बाजारात गोंड्याची फुले आणि आपट्याची पाने मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली होती. मात्र यंदा दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांनी भाव खाल्ला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
advertisement
झेंडूला 150 रुपयांपर्यंत भाव
दसऱ्यामध्ये झेंडूच्या फुलांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. दरवर्षी बाजारात गोंडा 60 ते 70 रुपये किलोने विकला जातो. पण यंदा सलग दोन ते तीन दिवस पाऊस असल्यामुळे मुंबईच्या बाजारात गोंडा 150 ते 160 रुपये किलोने विकला जात आहे. दोन ते तीन दिवस पाऊस असल्यामुळे फुलांची आवक कमी झाली आहे. या आधी गोंडा 60 ते 80 रुपये किलो होता. आता आवक कमी असल्याने तोच गोंडा 150 ते 160 किलो झाल्याचे फुल विक्रेत्याकडून सांगण्यात आले.
advertisement
मोगरा 1200 रुपये किलो
झेंडू बरोबरच इतर फुलांच्या भावातही मोठी वाढ झालीये. मोगरा 1200 रुपये किलोने बाजारात विकला जात आहे. तर चाफा आज 400 रुपये शेकडा विकला जातोय. यंदा पावसामुळे फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फूल उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक दळणवळण खर्च परवडत नाही. त्यामुळे यंदा फुलांच्या दरात तेजी असल्याचेही फूल व्यापाऱ्यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2024 1:02 PM IST