मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याने वाद उफाळला, विरोधकांनी टोले
- Published by:Prachi Amale
Last Updated:
महापौरांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही पुढे येत रितू तावडेंची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय.
मुंबई : जैन मुनींमुळे आपला घसा बरा झाल्याचं विधान मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी बोरिवलीतल्या एका कार्यक्रमात केलं आहे.महापौरांच्या या विधानावरून विरोधकांनी टोले हाणलेत. तर महापौरांनी पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलंय
मुंबईतल्या बोरीवलीत महावीर जयंती निमित्तानं आयोजित कार्यक्रमात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह मंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजप नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचं महापौरांनी यावेळी सांगितलंय. याच कार्यक्रमात बोलताना महापौर रितू तावडेंनी आपल्याला आलेला अनुभव कथन केला.
रितू तावडे यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी निशाणा साधलाय. ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांची रितू तावडेंवर टीका करताना जीभ घसरली. राऊतांच्या या टीकेवर रितू तावडेंनी संताप व्यक्त केलाय. महापौरांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही पुढे येत रितू तावडेंची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय. तर दुसरीकडे महापौर रितू तावडेंनी पत्रकार परिषद घेत आपण केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा केलाय.
advertisement
रितू तावडे यांनी आपल्या वक्तव्याबाबत खुलासा केला असला तरी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण मात्र तापलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 9:19 PM IST









