मुंबई पालिकेत ठाकरेंची अग्निपरीक्षा, 69 मतदारसंघात ठाकरे VS शिंदे ; कुणाची होणार राजकीय सरशी?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
ठाकरे बंधू आणि शिंदेंच्या शिवसेनेत 87 जागांवर थेट सामना होणार असून ब्रँड ठाकरेसाठी ही अग्निपरिक्षा ठरणार आहे.
मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागलं आहे. मुंबईत गेल्या 25 वर्षांपासून ठाकरेंची सत्ता राहिली आहे. मात्र शिवसेनेत पडलेली फूट, भाजपची वाढलेली ताकद आणि मुंबईत वाढलेली परप्रांतीयांची लोकसंख्या यामुळे यंदाच्या निवडणुकीत समीकरणं बदललं आहे. त्यातच ठाकरे बंधू आणि शिंदेंच्या शिवसेनेत 87 जागांवर थेट सामना होणार असून ब्रँड ठाकरेसाठी ही अग्निपरिक्षा ठरणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीला वेगळं राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. कारण या निवडणूकीत ‘ब्रँड ठाकरे’ची कसोटी लागणार आहे. शिवसेनेतील फूट, बदललेली राजकीय समीकरणं आणि मराठी मतदारांवरील पकड या पार्श्वभूमीवर ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचं मोठं आव्हान ठाकरेंसमोर असणार आहे. मुंबईतील 227 जागांपैकी 87 जागांवर ठाकरे बंधू आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात सामना रंगणार आहे.
advertisement
मुंबई महापालिकेचा रणसंग्राम कुणाविरुद्ध कोण?
- शिंदे VS ठाकरे- 87 जागा
- शिंदेंची शिवसेना VS ठाकरेंची शिवसेना- 69 जागा
- शिंदेंची शिवसेना VS मनसे- 18 जागा
शिंदे आणि ठाकरेंमधील सामना याआधीही लोकसभा आणि विधानसभेत पाहायला मिळाला होता. मात्र त्यावेळी मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा चांगली कामगिरी केल्याचं दिसून आलं. लोकसभा निवडणूक 2024 साली मुंबईत 4 जागांवर ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना झाला. त्यापैकी 3 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं विजय मिळवल्या. तर शिंदेंनी 3 जागा लढवल्या आणि एका जागेवर त्यांना विजय मिळाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मुंबईत 10 मतदारसंघात हे दोन्ही पक्ष आमने सामने आले. त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 7 उमेदवार विजयी झाले. तर शिंदेच्या शिवसेनेचे केवळ 3 उमेदवार विजयी झाले
advertisement
बीएमसीच्या निवडणुकीत शिंदे VS ठाकरे आणखी तीव्र
मात्र बीएमसीच्या निवडणुकीत हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे.मराठीबहुल भागात दोन्ही शिवसेनेत चुरशीची टक्कर होत असून तिथला सामना मराठी विरुद्ध मराठी असा असणार आहे . मुंबई नेहमीत शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून त्यातच आता राज ठाकरेही सोबत आल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेची संघटनात्मक ताकद दुप्पट झाल्याचा दावा केला जात आहे.ठाकरे बंधूंकडून प्रचारात ‘मराठी माणूस’ आणि ‘मराठी अस्मिता’ या मुद्द्यांवर विशेष भर दिला जात आहे. दुसरीकडे, ठाकरे बंधूंच्या मराठीच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून ‘हिंदुत्वा’चं कार्ड खेळलं गेलं आहे.
advertisement
मुंबईत खरी शिवसेना कोणाची?
एकूणच बीएमसीची निवडणूक ही केवळ स्थानिक सत्तेसाठीची लढाई न राहता, ठाकरे विरुद्ध शिंदे, मराठी अस्मिता विरुद्ध हिंदुत्व आणि वारसा विरुद्ध बंडखोरी अशी बहुआयामी ठरणार आहे. शिवाय ज्या मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला त्या मुंबईत खरी शिवसेना कोणाची याचाही फैसला होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 05, 2026 9:22 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई पालिकेत ठाकरेंची अग्निपरीक्षा, 69 मतदारसंघात ठाकरे VS शिंदे ; कुणाची होणार राजकीय सरशी?











