advertisement

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कोंडीदरम्यान वसूल केलेला टोल 'रिफंड' होणार, किती दिवसांत येणार पैसे

Last Updated:

मुंबई पुणे एक्सप्रेस वेमधील वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या वाहनांना टोल माफी केली जाणार आहे.

mumbai pune express way to refund toll collected during traffic jam see latest news
mumbai pune express way to refund toll collected during traffic jam see latest news
खोपोली: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टँकर उलटल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 3 फेब्रुवारी रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीजवळील आडोशी बोगद्याजवळ प्रोपलिन हा ज्वलनशिल वायू वाहून नेणारा टँकर उलटल्यामुळे तब्बल 32 तासांसाठी भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अनेक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या गंभीर परिस्थितीत वाहनचालकांची आणि इतर प्रवाशांचीही चांगलीच गैरसोय झाली होती. यामुळे आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेमधील वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या वाहनांना टोल माफी केली जाणार आहे.
एक्सप्रेस वेवर झालेल्या वाहतूक कोंडीच्या काळामध्ये प्रवाशांकडून वसूल करून घेण्यात आलेला टोल वाहन मालकांना परत करण्याबाबत महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सकारात्मक आहे. येत्या आठ दिवसांमध्ये या प्रकरणाची कार्यवाही पूर्ण करून टोल परत केला जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अधिकारी राकेश सोनावणे यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर 3 फेब्रुवारी रोजी 32 तास झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये वाहन चालक आणि प्रवाशांची गैरसोय झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने आणि एमएसआरडीसीने अडकलेल्या वाहनांना टोलवसुली करण्याची निर्णय घेतला आहे.
advertisement
अलीकडेच, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकार्‍यांची IRB कंपनीने प्रवाशांकडून टोल वसूली केल्याच्या निषेधार्थ MSRDC, IRB आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांची खालापूर टोल नाका येथे बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकार्‍यांनी सर्व अधिकाऱ्यांना जाब विचारत कोंडीदरम्यान वसूल केलेला टोल प्रवाशांना परत करण्याची ठाम मागणी केली. यावेळी बैठकीमध्ये, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या पदाधिकार्‍यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमोर सर्वच गैर सुविधांचा पाढा वाचून दाखवला. बैठकीमध्ये, संबंधित अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या मागण्या मान्य करत लवकरात लवकर कोंडीदरम्यान वसूल केलेले प्रवाशांच्या टोलचे पैसे त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कोंडीदरम्यान वसूल केलेला टोल 'रिफंड' होणार, किती दिवसांत येणार पैसे
Next Article
advertisement
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement