advertisement

mumbai : नवऱ्याचा दोस्ताशी जुळलं अन् सासू-नवऱ्याच्या जेवणात विष कालवलं, काजलने दोघांनाही संपवलं, पण...

Last Updated:

जवळपास 10 वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू होते. त्यानंतर कमलकांत यांची हत्या करण्याचा कट आखण्यात आला असावा असा पोलिसांचा संशय होता.

सुनेनं अशाच प्रकारे आपला पती आणि सासूला विष देऊन ठार मारलं होतं.
सुनेनं अशाच प्रकारे आपला पती आणि सासूला विष देऊन ठार मारलं होतं.
कमलकांत शाह असे मृताचे नाव असून त्यांचा कवितासोबत 2002 मध्ये विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. मृत कमलकांत शाह आणि आरोपी हितेश जैन यांची जुनी मैत्री होती. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या मैत्री झाली होती. त्यातच मृत कमलकांत यांची पत्नी कविता उर्फ काजल आणि हितेश जैन यांच्यात विवाहबाह्य प्रेमसंबंध तयार झाले होते.
advertisement
जवळपास 10 वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू होते. त्यानंतर कमलकांत यांची हत्या करण्याचा कट आखण्यात आला असावा असा पोलिसांचा संशय होता. प्राथमिक तपासातून पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली.
दरम्यान, कमलकांत शाह हे मुंबईतील सांताक्रूझ परिसरात राहतात. तिने पतीसोबत सासूचीही हत्या केल्याची माहिती आता समोर आली. काजल आणि तिच्या प्रियकराने आपल्या सासूची अशीच हत्या केल्याची कबुली दिली. कमलकांतच्या आईचीही या दोघांनीच हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, दोघांनी या मृत्यूमध्ये आपला सहभाग असल्याचा इन्कार केला होता.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मृत कमलकांत शाह यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कमलकांत यांना पोटात दुखत असल्याची तक्रार होती. दरम्यान त्यांना उपचारावेळी मृत्यू झाला.
यावेळी कमलकांत शाह यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. हा अहवाल पाहिल्यानंतर पोलीसांनाही याबाबत थोडा संशय आला. विषबाधेतून त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तसाच मृत्यू त्यांच्या सासूचाही मृत्यू झाला आहे. या दोन्ही मृत्यूंमध्ये साम्य असल्याने आईच्या मृत्यूचा तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितलं.
advertisement
शवविच्छेदन अहवालात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी कलम 302, 328, 120 (बी) नुसार, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हितेश जैन आणि कविता यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा उलगडा झाला होता. या दोघांमधील प्रेमसंबंध हे मागच्या 10 वर्षांपासून सुरू असल्याचे समोर आलं.
आरोपी हितेश जैन आणि कविता यांना विवाह करायचा होता. त्यामुळे त्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या कमलकांतला दूर करण्याचा कट आखला. कमलकांतला मारल्यानंतर दोघेही विवाह करणार होते, असं तपासातून समोर आलं. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
mumbai : नवऱ्याचा दोस्ताशी जुळलं अन् सासू-नवऱ्याच्या जेवणात विष कालवलं, काजलने दोघांनाही संपवलं, पण...
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement