मुंबईत ठाकरे बंधूंना मोठा धक्का, 7 शिवसैनिकांची बंडखोरी, कुठे कुठे मनधरणी करावी लागणार?

Last Updated:

ठाकरे बंधूंना बंडखोरांचा मनस्ताप झाला असून बंडोबांना थंडोबा करण्याची मोहीम पक्षांनी सुरू केली आहे.

News18
News18
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. ज्या इच्छुकांना पक्षाचा AB फॅार्म मिळाला नाही त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे, अशा बंडखोरांचा मनस्ताप सर्वच पक्षांना झाला आहे. मुंबईत ठाकरे बंधूची यादी जाहीर झाल्यानंतर बंडाचे निशाण फडकले आहे.
शिवसेना ठाकरे गट 163 जागा, मनसे 53 जागा लढवणार आहे. एबी फॉर्म वाटताना प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी आणि नाराजीनाट्य रंगले असून उद्धव ठाकरेंच्या 7 पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. तर मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने अपक्ष म्हणून बंडखोरी केली आहे. या बंडखोरांचा मनस्ताप सर्वच पक्षांना झाला आहे. त्यासाठी आता या बंडोबांना थंडोबा करण्याची मोहीम सर्वच पक्षांनी सुरू केली आहे.
advertisement

ठाकरे मनसे युती बंडखोरी...

उमेदवाराचे नाव

वॉर्ड क्रमांक

पक्ष

चंद्रशेखर वायंगणकर95शिवसेना उद्धव ठाकरे
सागर देवरे106शिवसेना उद्धव ठाकरे
अनिशा माझगांवकर114मनसे
कमलाकर नाईक169शिवसेना उद्धव ठाकरे
सूर्यकांत कोळी193शिवसेना उद्धव ठाकरे
संगीता जगताप196शिवसेना उद्धव ठाकरे
विजय इंदुलकर202शिवसेना उद्धव ठाकरे
दिव्या बडवे203शिवसेना उद्धव ठाकरे
advertisement

बंडखोरांना नेमकं काय आश्वासनं दिले जाणार? 

ठाकरेंच्या बंडखोरांना पक्षाच्या नेत्यांसमोर आणून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत. जे बंडखोर शांत होत नाही, अशा बंडखोरांना नेमकं काय आश्वासनं दिली जाणार आहे हे पाहणे महत्तावाचे ठरणार आहे. तसेच जे बंडखोर आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत त्यांच्यावर पक्ष शिस्त भंगाची कारवाई करत थेट पक्षातून हकालपट्टी करणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी पक्षांचे नेते सक्रिय झालेत. यात किती यशस्वी होणार हे येत्या 3 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल.
advertisement

मनसेच्या संपूर्ण उमेदवारांची संपूर्ण यादी

क्रमांकवॉर्ड क्रमांकउमेदवाराचे नाव
18कस्तुरी रोहेकर
210विजय कृष्णा पाटील
311कविता बागुल माने
414पुजा कुणाल माईणकर
518सदिच्छा मोरे
620दिनेश साळवी
721सोनाली देव मिश्रा
823किरण अशोक जाधव
927आशा विष्णू चांदर
1036प्रशांत महाडीक
1138सुरेखा परब लोके
1246स्नेहिता संदेश डेहलीकर
1355शैलेंद्र मोरे
1458वीरेंद्र जाधव
1567कुशल सुरेश धुरी
1668संदेश देसाई
1774विद्या भरत आर्य
1881शबनम शेख
1984रूपाली दळवी
2085चेतन बेलकर
2198दिप्ती काते
22102अनंत हजारे
23103दिप्ती राजेश पांचाळ
24106सत्यवान दळवी
25110हरीनाक्षी मोहन चिराथ
26115ज्योती अनिल राजभोज
27119विश्वजीत शंकर ढोलम
28128सई सनी शिर्के
29129विजया गिते
30133भाग्यश्री अविनाश जाधव
31139शिरोमणी येशू जगली
32143प्रांजल राणे
33146राजेश पुरभे
34149अविनाश मयेकर
35150सविता माऊली थोरवे
36152सुधांशू दुनबळे
37166राजन मधुकर खैरनार
38175अर्चना दिपक कासले
39177हेमाली परेश भनसाली
40178बजरंग देशमुख
41183पारूबाई कटके
42188आरिफ शेख
43192यशवंत किल्लेदार
44197रचना साळवी
45205सुप्रिया दळवी
46207शलाका हरियाण
47209हसीना महिमकर
48212श्रावणी हळदणकर
49214मुकेश भालेराव
50216राजश्री नागरे
51217निलेश शिरधनकर
52223प्रशांत गांधी
53226बबन महाडीक
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत ठाकरे बंधूंना मोठा धक्का, 7 शिवसैनिकांची बंडखोरी, कुठे कुठे मनधरणी करावी लागणार?
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement