Ajab Gajab : थाळीत भाजी-पोळी अन् वरून लाल माती, जगातील असं बेट जिथे लोक चक्क माती खातात; कारण आश्चर्यचकीत करेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
इराणमधील हे अनोखे बेट सध्या पर्यटकांच्या आणि वैज्ञानिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या मातीचा रंग, तिची चव आणि त्यामागची शेकडो वर्षांची परंपरा खरोखरच थक्क करणारी आहे.
मुंबई : जेवण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती वाफाळलेली भाजी, पोळी, वरण-भात आणि त्याला चव देणारे विविध मसाले. जेवणात चवीसाठी मीठ आणि मसाले वापरणं गरजेचं आहे. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की कोणीतरी चवीसाठी मसाल्याऐवजी थेट 'माती' वापरत असेल तर? हे ऐकायला विचित्र वाटू शकतं, पण हे सत्य आहे.
जगाच्या पाठीवर एक असं बेट आहे, जिथे माती केवळ पायाखाली तुडवण्यासाठी नाही, तर चक्क जेवणात चव वाढवण्यासाठी वापरली जाते. इराणमधील हे अनोखे बेट सध्या पर्यटकांच्या आणि वैज्ञानिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या मातीचा रंग, तिची चव आणि त्यामागची शेकडो वर्षांची परंपरा खरोखरच थक्क करणारी आहे.
'मंगळ' ग्रहासारखी दिसणारी जमीन: होर्मुझ आयलंड
इराणच्या दक्षिणेला इराणच्या आखातात (Persian Gulf) 'होर्मुझ आयलंड' (Hormuz Island) नावाचे एक छोटेसे बेट आहे. हे बेट जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री व्यापार मार्गावर वसलेले आहे. पण याची खरी ओळख व्यापारापेक्षा इथल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे जास्त आहे. या बेटावरील मातीचा रंग गडद लाल असून, ती पाहिल्यावर आपण पृथ्वीवर नसून 'मंगळ' ग्रहावर आलो आहोत की काय, असा भास होतो.
advertisement
इथल्या स्थानिक लोक लाल मातीला 'गेलक' (Gelack) म्हणतात. ही माती केवळ शोभेची वस्तू नाही, तर ती इथल्या लोकांच्या अन्नाचा अविभाज्य भाग आहे. लोक ही माती ब्रेड, मासे, स्थानिक सॉस आणि रोटीमध्ये मसाला म्हणून वापरतात. या मातीची चव थोडी खारट, थोडी गोड आणि खनिजांनी युक्त असल्याचे सांगितले जाते. या मातीमध्ये लोह (Iron Oxide) आणि इतर खनिजे मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे तिला हा गडद लाल रंग प्राप्त झाला आहे.
advertisement
होर्मुझ आयलंडला जगातील सर्वात रंगीबेरंगी बेट मानले जाते. याला 'रेनबो आयलंड' असेही म्हणतात. येथे डोंगर आणि जमिनीमध्ये तब्बल 70 पेक्षा जास्त नैसर्गिक रंग पाहायला मिळतात. लाल, पिवळा, नारंगी, जांभळा आणि सोनेरी रंगांच्या छटांमुळे हे बेट एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हाससारखे वाटते. जेव्हा समुद्राच्या लाटा किनाऱ्याला धडकतात, तेव्हा पाण्याचा रंगही लाल होतो, जे दृश्य अतिशय दुर्मिळ आणि मंत्रमुग्ध करणारे असते.
advertisement
भूवैज्ञानिक दृष्टिकोनातून हे बेट अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे इराण सरकारने येथील माती किंवा दगड बेटाबाहेर नेण्यावर कडक बंदी घातली आहे. पर्यटकांना येथील नैसर्गिक साधनसंपत्तीला धक्का न लावण्याच्या कडक सूचना दिल्या जातात, जेणेकरून ही अनोखी वारसा वास्तू पुढच्या अनेक पिढ्यांसाठी सुरक्षित राहील.
होर्मुझ आयलंडवरील माती खाण्याची ही परंपरा केवळ भूकेसाठी नाही, तर ती तिथल्या संस्कृतीचा आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचा भाग आहे. जगातील विविधतेचे हे एक उत्तम उदाहरण आहे, जे आपल्याला सांगते की निसर्ग किती अनाकलनीय आणि समृद्ध आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 8:28 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Ajab Gajab : थाळीत भाजी-पोळी अन् वरून लाल माती, जगातील असं बेट जिथे लोक चक्क माती खातात; कारण आश्चर्यचकीत करेल







