Vande Bharat Depot: रेल्वेचा मोठा निर्णय! अत्याधुनिक सुविधांसह मुंबईत 'या' ठिकाणी उभारला जातोय ‘वंदे भारत’ ट्रेनसाठी डेपो

Last Updated:

भारतीय रेल्वेने पश्चिम आणि मध्य रेल्वेवर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनसाठी लवकरच डेपो उभारला जाणार आहे. वंदे भारत आणि वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या दुरूस्ती आणि देखभालीसाठी मुंबईमध्ये एक महत्त्वाची जागा निवडण्यात आली आहे.

तिकीटांचे दर देखील स्पष्ट झाले आहेत. चेअर कारमध्ये प्रवास करण्यासाठी भाडे 1500 ते 1900 रुपये असेल, तर एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये भाडे 2000 ते 2500 रुपये अपेक्षित आहे. प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळेल.
तिकीटांचे दर देखील स्पष्ट झाले आहेत. चेअर कारमध्ये प्रवास करण्यासाठी भाडे 1500 ते 1900 रुपये असेल, तर एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये भाडे 2000 ते 2500 रुपये अपेक्षित आहे. प्रवाशांना आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळेल.
भारतीय रेल्वेने पश्चिम आणि मध्य रेल्वेवर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनसाठी लवकरच डेपो उभारला जाणार आहे. वंदे भारत आणि वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या दुरूस्ती आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी टर्मिनसजवळ जागा निवडण्यात आली आहे. जोगेश्वरी आणि राम मंदिर स्टेशनदरम्यान टर्मिनसचे काम सुरू आहे. त्यामुळे डेपोसाठी जागा निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर डेपोचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून हे रखडलेलं काम आता लवकरच मार्गी लागणार आहे.
पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांना अतिरिक्त मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांची सुविधा मिळणार आहे. या टर्मिनसवर तीन मार्गिका असणार आहेत, ज्याद्वारे 12 मेल आणि एक्सप्रेस चालवल्या जातील. पश्चिम रेल्वेने कनेक्टिव्हिटीचा आणि भविष्यातील विस्ताराचा विचार करून पश्चिम द्रुतगती मार्गाजवळच्या जोगेश्वरी- राम मंदिर स्थानकांदरम्यानचा सहा एकरचा परिसर निवडला. पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेवरही डेपो उभारला जाणार आहे. मध्य रेल्वेने सीएसएमटीजवळील वाडी बंदरच्या जागेची निवड केली आहे. या दोन्ही ठिकाणांवर लवकरच डेपो उभारण्याचे काम सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
advertisement
भविष्यात पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवर वंदे भारत ट्रेनची संख्या वाढवण्याचे काम प्रस्तावित आहे. परंतु, त्यांची देखभाल आणि दुरुस्तीसाठी मुंबईमध्ये वेगळा डेपो नाही. त्यासाठी पश्चिम रेल्वे आत्ताच तरतूद करत असून, भविष्यात होणार्‍या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी हा डेपो उभारण्याचे नियोजन करत आहे. भारतीय रेल्वेवरील वंदे भारत एक्सप्रेसच्या उच्च- तंत्रज्ञानाच्या गाड्यांची देखभाल आता अत्याधुनिक पद्धतीने केली जाणार आहे. पारंपरिक एक्सप्रेस ट्रेनच्या तुलनेत या गाड्यांसाठी स्वतंत्र्य आणि आधुनिक डेपो उभारण्यात येणार आहे. देखभालीच्या प्रत्येक टप्प्यात अचूकता आणि स्वयंचलित प्रणालींचा वापर केला जातो.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Vande Bharat Depot: रेल्वेचा मोठा निर्णय! अत्याधुनिक सुविधांसह मुंबईत 'या' ठिकाणी उभारला जातोय ‘वंदे भारत’ ट्रेनसाठी डेपो
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement