Mumbai Local : ब्रेकअपचं वेड डोक्यात शिरलं; पनवेलमध्ये लोकलच्या लेडीज डब्यात प्रियकराचा नको प्रताप, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Last Updated:

मंगळवारी संध्याकाळी ही तरुणी पनवेल स्टेशनवरून कुर्ला येथे जाण्यासाठी लोकलमध्ये चढली. तिला त्रास देण्यासाठी राहुलने चक्क महिलांसाठी राखीव असलेल्या लेडिज डब्यात प्रवेश केला.

लेडीज डब्यातून तरुणीचा पाठलाग (AI Image)
लेडीज डब्यातून तरुणीचा पाठलाग (AI Image)
नवी मुंबई: प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरून एका तरुणाने भलताच प्रताप केला. २१ वर्षीय तरुणीचा धावत्या लोकलच्या महिला डब्यात शिरून पाठलाग करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाला पनवेल रेल्वे पोलिसांनी (GRP) अटक केली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी पनवेल ते कुर्ला या प्रवासादरम्यान घडली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचे राहुल यादव (वय २५) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणास्तव तरुणीने त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. ही गोष्ट राहुलला सहन झाली नाही. मंगळवारी संध्याकाळी ही तरुणी पनवेल स्टेशनवरून कुर्ला येथे जाण्यासाठी लोकलमध्ये चढली. तिला त्रास देण्यासाठी राहुलने चक्क महिलांसाठी राखीव असलेल्या लेडिज डब्यात प्रवेश केला.
advertisement
राहुलने पनवेलपासून तरुणीचा पाठलाग सुरू केला आणि तो महिला डब्यातच बसून तिच्यासोबत कुर्ल्यापर्यंत प्रवास करत राहिला. यामुळे तरुणीला प्रचंड मानसिक त्रास आणि भीतीचा सामना करावा लागला. या घटनेची तक्रार प्राप्त होताच पनवेल लोहमार्ग पोलिसांनी तातडीने कारवाई करत राहुल यादवला बेड्या ठोकल्या.
राहुल यादवविरुद्ध केवळ छेडछाडच नाही, तर रेल्वे कायद्याच्या विविध कलमांनुसारही कारवाई करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने दोन मोठे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. एक तर विनातिकीट प्रवास करणे. कारण त्याच्याकडे प्रवासाचे वैध तिकीट नव्हते आणि दुसरं म्हणजे महिला डब्यात बेकायदेशीर प्रवेश. रेल्वे कायद्यानुसार महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात पुरुष प्रवाशाने प्रवेश करणे हा दंडनीय अपराध आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांनी स्थानकांवर गस्त वाढवली आहे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : ब्रेकअपचं वेड डोक्यात शिरलं; पनवेलमध्ये लोकलच्या लेडीज डब्यात प्रियकराचा नको प्रताप, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Next Article
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं सगळं सांगितल
  • सरतं वर्ष २०२५ हे सोनं-चांदीसाठी ऐतिहासिक ठरलं.

  • सोनं-चांदीच्या दरात आलेल्या तेजीने गुंतवणूकदारांना शेअर बाजारापेक्षा जबरदस्त रिट

  • आता पुढील २०२६ वर्षात कोण अधिक रिटर्न देईल, यावर एक्सपर्टने भाष्य केलं आहे.

View All
advertisement