Coaching Centres : विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी; खासगी कोचिंग वर्गांवर आता सरकारी वॉच
Last Updated:
School Guidelines : विद्यार्थ्यांवरील वाढता मानसिक ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने शाळा आणि खासगी शिकवणी वर्गांसाठी नवीन नियम लागू केले आहेत.
मुंबई : स्पर्धा परीक्षा, शाळा आणि खासगी शिकवणी वर्गांमुळे विद्यार्थ्यांवर वाढत चाललेल्या मानसिक ताणामुळे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांवर अतिरिक्त शैक्षणिक आणि मानसिक ताण येऊ नये यासाठी शाळा आणि खासगी शिकवणी वर्गांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना लागू करण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खासगी कोचिंग वर्गांची मनमानी थांबणार
विद्यार्थ्यांवर खासगी शिकवणी आणि कोचिंग वर्गांमधून होणाऱ्या मानसिक ताणतणावाबाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर भूमिका घेतली होती. सुखदेव सहा यांनी आंध्र प्रदेश सरकारविरोधात दाखल केलेल्या याचिकेत स्पर्धा परीक्षा, जास्त वेळ वर्ग, सततच्या चाचण्या, निकालांची तुलना आणि यशाची हमी देणाऱ्या जाहिरातींमुळे विद्यार्थ्यांवर असह्य दबाव निर्माण होत असल्याचा मुद्दा मांडला होता.
advertisement
या प्रकरणावर 25 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देत देशातील सर्व राज्य सरकारांना विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी ठोस मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश दिले होते. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यावरही भर देण्यात आला होता.
या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अनावश्यक दबावावर आता प्रशासकीय पातळीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा आणि खासगी शिकवणी वर्गांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
advertisement
आता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय निरीक्षण समिती स्थापन करण्यात आलेले आहे. या समितीत शिक्षण विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, महिला आणि बालविकास अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ता किंवा बाल-मानसतज्ज्ञ यांचा समावेश असणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 09, 2026 12:58 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Coaching Centres : विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी; खासगी कोचिंग वर्गांवर आता सरकारी वॉच









