Leptospirosis : मुसळधार पावसानंतर लेप्टोचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता;वेळीच ओळखा लक्षणे अन् कशी घ्याल काळजी
Last Updated:
Leptospirosis Infection : मुंबईतील जोरदार पावसामुळे लेप्टोस्पायरोसिसच्या प्रकरणात वाढ होण्याची शक्यता आहे. या आजाराची लक्षणे वेळेत ओळखा. योग्य काळजी घेऊन लक्षणे कमी करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मुंबई : मुंबईत शनिवारीच्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झालेले आहेत. पावसाचे प्रमाण काही ठिकाणी 150 मिमी ते 200 मिमीपर्यंत नोंदवले गेले. यामुळे नागरिकांना अनिवार्यपणे जलमय असलेल्या रस्त्यांवरून आणि गल्ल्यांमधून जावे लागले. या परिस्थितीत पावसाळ्यापासून संबंधित काही आजारांचा धोका देखील वाढतो. त्यातील एक महत्त्वाचा आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस.
लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग कसा होतो?
लेप्टोस्पायरोसिस ही एक जीवाणूजन्य आजार आहे, जो मुख्यत हा उंदीर,कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्यांच्या संक्रमित लघवी किंवा मलमूत्राच्या संपर्कातून पसरतो. साचलेल्या पाण्यामुळे या जीवाणूंचा प्रसार जलद गतीने होतो आणि ज्या लोकांना पाण्यात जास्त वेळ घालवावा लागतो किंवा पाण्याच्या संपर्कात येण्याचा धोका अधिक असतो, त्यांना या आजाराचा धोका वाढतो.
advertisement
बीएमसीच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीप्रमाणे, ज्यांनी पावसाळ्यातील पाणी साचलेल्या भागातून गेले आहे किंवा त्या भागात जास्त वेळ थांबले आहेत, त्यांना तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. प्रारंभिक लक्षणे ओळखणे खूप महत्त्वाचे आहे.
लक्षणे
सर्वसाधारणपणे, लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळ्या पद्धतीने दिसू शकतात. काही लोकांना फ्लूसारखी सौम्य लक्षणे दिसतात, तर काहींना सुरुवातीला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. मात्र गंभीर प्रकरणांमध्ये, या आजारामुळे शरीरातील अंतर्गत अवयवांवर परिणाम होऊ शकतो आणि रक्तस्त्रावाची समस्या देखील उद्भवू शकते.
advertisement
तीव्र लेप्टोस्पायरोसिसमध्ये लक्षणे अचानक दिसू लागतात. यामध्ये सर्वप्रथम उच्च ताप येतो आणि डोळे लाल होतात, ज्याला कंजंक्टिव्हल इंजेक्शन म्हणतात. रुग्णाला डोकेदुखी, स्नायू दुखणे, तसेच थंडी वाजून येणे यासारखी लक्षणे जाणवतात. पोटदुखी, मळमळ, उलट्या आणि अतिसार देखील सामान्य लक्षणांमध्ये समाविष्ट आहेत. काही प्रकरणांमध्ये त्वचा किंवा डोळे पिवळसर रंगाचे होतात, ज्याला कावीळ म्हणतात. याशिवाय शरीरावर पुरळ किंवा त्वचेवर लालसर डाग दिसण्याची शक्यता असते.
advertisement
लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण उपचार लवकर सुरू केल्यास गंभीर आजाराचा धोका कमी होतो. योग्य वेळेत केलेल्या औषधोपचाराने रुग्ण लवकर बरे होतो आणि अवयवांचे नुकसान टाळता येते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2025 7:54 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Leptospirosis : मुसळधार पावसानंतर लेप्टोचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता;वेळीच ओळखा लक्षणे अन् कशी घ्याल काळजी