गेटवे ते मांडवा फेरी बोट बंद, मग अलिबागला कसं जायचं, तुमच्याकडे 3 बेस्ट पर्याय, पाहा कोणते

Last Updated:

Mumbai News: गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग जलवाहतूक पावसामुळे 3 महिने बंद राहणार आहे. या काळातील पर्यायी मार्गांबाबत जाणून घेऊ.

अलिबागला जाण्याचे पर्याय: जलवाहतूक बंद असल्यास रस्त्याने प्रवासाचे मार्ग
अलिबागला जाण्याचे पर्याय: जलवाहतूक बंद असल्यास रस्त्याने प्रवासाचे मार्ग
मुंबई: दरवर्षी पावसाळ्यात गेटवे ऑफ इंडिया ते अलिबागमधील मांडवा ही प्रवासी जलवाहतूक बंद ठेवण्यात येते. यंदा देखील 25 मेपासून ते 31 ऑगस्टपर्यंत जवळपास 3 महिन्यांसाठी ही वाहतूक बंद राहणार आहे. याबाबत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने माहिती दिली असून यंदा वादळी पावसामुळे काही दिवस आधीपासूनच जलवाहतूक बंद होत आहे. या काळात प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
गेटवे ते मांडवा जलमार्ग
गेट वे ते मांडवा या जलमार्गावरून दररोज 3 हजारांसून अधिक प्रवासी प्रवास करतात. सुट्टीच्या दिवशी ही संख्या 8 ते 10 हजारांपर्यंत पोहोचते. या सेवेचा पर्यटक आणि स्थानिक प्रवाशांना देखील लाभ होतो. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत पीएनपी, मालदार आणि अंजठा या खाजगी कंपन्यांच्या बोटी प्रवाशांसाठी उपलब्ध असतात. परंतु, आता 3 महिने या बोटी बंद राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
advertisement
पर्यायी मार्ग कोणते?
रस्त्याने अलिबागला जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुंबई-अलिबाग दरम्यान नियमित व एसी एसटी बस सेवा चालू असते, जी किफायतशीर आणि सोयीची मानली जाते. तसेच, नवी मुंबईतील बेलापूरपर्यंत लोकल ट्रेनने जाऊन पुढे अलिबागसाठी बस किंवा टॅक्सीने प्रवास करता येतो. याशिवाय, दादरहून थेट टॅक्सी किंवा कॅब भाड्याने घेऊन अलिबागपर्यंत पोहोचता येते. स्वतःची कार असलेल्या प्रवाशांसाठी ड्राइव्ह करणे हा एक स्वयंपूर्ण पर्याय आहे.
advertisement
रो रो सेवा सुरू राहणार
गेट वे ते मांडवा ही फेरी सेवा बंद असली तरी ‘मांडवा ते भाऊचा धक्का’ दरम्यानची ‘रो-रो’ सेवा मात्र सुरू राहणार आहे. या सेवेचा पर्यटक आणि स्थानिक प्रवासी लाभ घेऊ शकतील. पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर 2025 पासून ही जलप्रवासी सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात गेट वे ऑफ इंडिया ते अलिबागमधील मांडवा दरम्यानची वाहतूक थांबवली जाते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर वादळी वारे आणि जोरदार पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे यंदा ही सेवा नियोजित वेळेपेक्षा पाच-सहा दिवस आधीच बंद करण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
गेटवे ते मांडवा फेरी बोट बंद, मग अलिबागला कसं जायचं, तुमच्याकडे 3 बेस्ट पर्याय, पाहा कोणते
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement