Panvel Crime: पूर्ववैमनस्याचा सूड? पनवेलमध्ये कर्ज फेडण्यासाठी थरारक गुन्हा, प्रवासी महिलेवर प्राणघातक हल्ला
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
पनवेलमध्ये एका व्यक्तीकडून पूर्ववैमनस्यातून एका महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे त्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पनवेल: पनवेलमध्ये एका व्यक्तीकडून पूर्ववैमनस्यातून एका महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे त्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जेमतेम 48 तासांतच पोलिसांनी त्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कर्ज फेडण्यासाठी प्रवासी महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्या महिलेकडील सोनं, पैसे आणि मोबाईलची चोरी करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकाला दोन दिवसाच्या आत अटक करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले. पोलिसांनी आरोपीकडून त्याने चोरलेला लाखोंचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
11 फेब्रुवारी रोजी (बुधवारी) संध्याकाळच्या सुमारास पीडित महिला संगिता सोमनाथ भोईर (रा. करंजाडे) ऑटो रिक्षाने आपल्या घरी जात होत्या. करंजाडे सेक्टर आर/04 परिसरातील सत्य ट्रायंडंट बिल्डींगच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवर रिक्षा पोहोचताच चालकाने रिक्षा बंद पडल्याचे कारण सांगत रिक्षा थांबवली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला संभ्रमात आली, तेवढ्यात रिक्षा ड्रायव्हरने त्या महिलेच्या गळ्यावर, छातीवर आणि पायावर धारदार चाकू काढून सपासप वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली, हल्ल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन, मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून घेतली आणि तिला रस्त्यावर सोडून पळ काढला.
advertisement
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेवर उपचार सुरू असून महिलेची तब्येत सध्या स्थिर आहे. पूर्ववैमनस्यातून महिलेवर हल्ला करण्यात आल्यामुळे पनवेल आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, घटनास्थळी सहायक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली. शिवाय, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या आदेशानुसार, गुन्हे शाखेकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला.
advertisement
पनवेल शहर पोलिसांनी तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपासणी करत, तांत्रिक विश्लेषण केले आणि साक्षीदारांची चौकशी केली. पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना एक प्रत्यक्षदर्शी देखील दिसला. त्याच्याकडून चौकशी करत त्यांच्या तपासाला अधिकच गती मिळाली. संबंधित रिक्षाच्या क्रमांकातील शेवटचे चार अंक साक्षीदाराने लक्षात ठेवले होते; मात्र सिरीज आणि कोड माहित नव्हता. या मर्यादित माहितीवरून पोलिसांनी त्या चार अंकांवर आधारित सर्व रिक्षांचा शोध सुरू केला. संशयित रिक्षाचालकांची चौकशी करताना 04 4619 या रिक्षाचा ड्रायव्हर अक्षय एकनाथ बागडे (वय 27, रा. करंजाडे, सेक्टर आर/03, पनवेल) याच्यावर संशय बळावला.
advertisement
अक्षय बागडेची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. कर्जाची परतफेड करण्यासाठी पैशांची गरज असल्याने हा गुन्हा केल्याची माहिती अक्षयने पोलिसांना प्राथमिक तपासात सांगितले. पोलिसांनी आरोपीकडून चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यासाठी वापरलेली ऑटो रिक्षा जप्त केली आहे. पुढील तपासासाठी आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली. या हत्येची चौकशी सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल, पोलीस निरीक्षक (प्रशासन) अभिजीत अभंग यांच्यासह शहर पोलीस ठाण्यातील अधिकार्यांनी
advertisement
आणि कर्मचाऱ्यांनी केली.
Location :
Navi Mumbai Panvel Raigarh,Raigad,Maharashtra
First Published :
Feb 15, 2026 10:08 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Panvel Crime: पूर्ववैमनस्याचा सूड? पनवेलमध्ये कर्ज फेडण्यासाठी थरारक गुन्हा, प्रवासी महिलेवर प्राणघातक हल्ला








