Panvel Railway Station : पनवेल स्थानकातील गर्दीचं टेन्शन मिटलं, सुरू झाला खास मार्ग, कसा होणार फायदा?

Last Updated:

Panvel Railway Station : पनवेल रेल्वे स्थानकातील भुयारी मार्ग पुन्हा सुरू झाला असून प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

News18
News18
पनवेल : पनवेल रेल्वे स्थानकातील भुयारी मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सकाळी आणि संध्याकाळी लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होते. पनवेलकडे जाण्यासाठी आता पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. रेल्वे प्रशासनाने हा मार्ग सुरू झाल्याने फक्त उड्डाणपुलावर अवलंबून राहावे लागत नाही आणि गर्दीमुळे होणारे अपघात टाळता येतात.
भुयारी मार्ग सुरु मात्र...
भुयारी मार्ग सुरु झाला असला तरी वापरणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. जड बॅगा, ट्रॉलीसह प्रवास करणे कठीण झाले आहे, कारण येथे अपुरी सोय आहे. लिफ्ट, रॅम्प किंवा स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना विशेष त्रास होतो.
प्रवास सुरक्षित ठेवण्यासाठी घेतलेला हा निर्णय असला तरी आवश्यक सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना तो अर्धवट वाटतो. लोकांना भुयारी मार्ग वापरताना त्रास होत असल्याची तक्रार सतत येत आहे. रेल्वे प्रशासनाने या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा प्रवाशांची समस्या कायम राहिल. संपूर्णपणे भुयारी मार्गा सुरु केला हा प्रवाशांसाठी एक दिलासा आहे पण सोयी-सुविधा न मिळाल्यामुळे हा निर्णय अद्याप पूर्णतहा कार्यक्षम ठरलेला नाही.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Panvel Railway Station : पनवेल स्थानकातील गर्दीचं टेन्शन मिटलं, सुरू झाला खास मार्ग, कसा होणार फायदा?
Next Article
advertisement
Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement