Mumbai Pod Taxi : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पॉड टॅक्सी प्रकल्प महत्त्वाच्या टप्प्यावर; आता इथं होणार टर्मिनस
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Pod Taxi Terminal : एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुर्ला पोलिस वसाहतीतील सुमारे 6,800 चौरस मीटर जमीन या प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे. सध्या या वसाहतीत 188 पोलिस कर्मचारी राहत असून त्यांच्याकडे प्रत्येकी सुमारे 180 चौरस फूट घर आहे.
मुंबई : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने महत्त्वाकांक्षी पॉड टॅक्सी प्रकल्प (ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम – एआरटीएस) पुढे नेण्याचे पाऊल उचलले आहे. कुर्ला परिसरामध्ये ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट स्टेशन (एआरटीएस) उभारण्यासाठी पोलिस क्वार्टरच्या जमिनीचा वापर करण्यात येणार आहे.
या ठिकाणी उभारणार 'पॉड टॅक्सी टर्मिनस'
एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुर्ला पोलिस वसाहतीतील सुमारे 6,800 चौरस मीटर जमीन या प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे. सध्या या वसाहतीत 188 पोलिस कर्मचारी राहत असून त्यांच्याकडे प्रत्येकी सुमारे 180 चौरस फूट घर आहे. या जागेचा वापर पॉड टॅक्सी टर्मिनससाठी करण्यात येणार असल्याने एमएमआरडीएकडून या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 450 चौरस फूट आकाराची एकूण 1,024 नवी घरे देण्यात येणार आहेत. पोलिस विभागाची औपचारिक मंजुरी मिळाल्यानंतर या जागेचा विकासाचा आराखडा अंतिम केला जाईल.
advertisement
पॉड टॅक्सी प्रकल्पांतर्गत वांद्रे आणि कुर्ला या दोन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांना वांद्रे-कुर्ला संकुलाशी (बीकेसी) जोडले जाणार आहे. या मार्गावर विनाअडथळा प्रवासासाठी अनेक एआरटीएस स्टेशन उभारले जाणार आहेत. तथापि दोन्ही स्थानकांजवळ पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने पर्यायी जागांचा शोध घेण्यात आला.
वांद्रे स्थानकाजवळील रेल्वे भूम विकास प्राधिकरणाची (आरएलडीए) जमीन या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली असून आरएलडीएने त्यांच्या 10 टक्के म्हणजेच सुमारे 4,000 चौ.मी. क्षेत्र एमएमआरडीएला देण्यास मंजुरी दिली आहे. हे स्टेशन वांद्रे स्टेशनजवळ सुरु असलेल्या स्कायवॉक प्रकल्पाशी जोडण्याचीही योजना आहे.
advertisement
एमएमआरडीएकडून सांगण्यात आले की प्रकल्पासाठी आवश्यक मंजुरी प्रक्रिया सुरू असून सर्व विभागांनी ती जलदगतीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बीकेसी परिसरातील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून सार्वजनिक वाहतुकीतील एक आधुनिक आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पॉड टॅक्सी मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 25, 2025 12:26 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Pod Taxi : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पॉड टॅक्सी प्रकल्प महत्त्वाच्या टप्प्यावर; आता इथं होणार टर्मिनस











