advertisement

...म्हणून सर्व राष्ट्रप्रमुख भारतात आले; जी20 वरून राऊतांचा खोचक टोला

Last Updated:

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

News18
News18
मुंबई, 12 सप्टेंबर : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. नुकत्याच झालेल्या जी20 शिखर परिषदेवरून त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. जी20 मध्ये आलेल्या प्रत्येक देशाला भारतातून काहीतरी मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं, त्यामुळे ते इथे आले. सगळे राष्ट्रप्रमुख त्यासाठीच इथे आले होते, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत?   
संजय राऊत यांनी भारतात नुकत्याच पार पडलेल्या जी20 शिखर परिषदेवरून केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  जी20 मध्ये आलेल्या प्रत्येक देशाला भारतातून काहीतरी मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं, त्यामुळे ते इथे आले. सगळे राष्ट्रप्रमुख त्यासाठीच इथे आले होते. जो बायडन यांच्यासोबत केलेला करार, प्रकाश आंबेडकरांनी पुराव्यासकट दिला होता. सौदीच्या राजकुमारासोबत केलेला बारसूचा करारही त्याचाच एक भाग आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
advertisement
मराठा आरक्षणावरून निशाणा  
दरम्यान मराठा आरक्षणावरून देखील त्यांनी टीका केली आहे. जरांगे पाटील मागे हटणार नाहीत. सरकारला मराठवाड्यातील कॅबिनेटपूर्वी हे सगळं गुंडाळायचं आहे. लोकांनी विरोध करू नये, यांच्या गाड्या फोडू नेय, रस्त्यावर उतरू नये यासाठीच हे सर्व सुरू आहे. कालच्या बैठकीचं कोणाला काही पडलं नाही, त्यातून काहीच साध्य झालं नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी इंडिया आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याच देखील म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
...म्हणून सर्व राष्ट्रप्रमुख भारतात आले; जी20 वरून राऊतांचा खोचक टोला
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement