डोंबिवलीत अष्टमीला हवनकुंडात तूप टाकलं अन् ओढणी पेटली, 2 आठवड्यानंतर दिवाळीआधी महिलेची प्राणज्योत मालवली
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डोंबिवलीतील सरिता ढाका यांच्या ओढणीला नवरात्र अष्टमीच्या होमकुंडात आग लागली, गंभीर भाजल्याने दोन आठवड्यांनी त्यांचा मृत्यू झाला. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवरात्र उत्सव म्हणजे वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी केलेली देवीची आराधना आणि प्रार्थना, या कालावधीमध्ये सगळ्या वाईट गोष्टींवर मात मिळावी यासाठी प्रयत्न करतो. मात्र डोंबिवलीतील सरिता ढाका यांच्या नशीबी काहीतरी वेगळंच होतं. वाईटावर मात करता करता त्यांच्यावरच काळाने झडप घातली आणि मंडपातलं मंगलमय वातावरण शोकाकूल झालं. सरिता यांच्या नशीबी काहीतरी वेगळंच होतं. नियतीनं घात केला आणि सरिता यांच्यावर मोठं संकट ओढवलं. त्या संकटाशी त्या दोन झुंज देत असतानाच त्यांचा अखेर मृत्यू झाला. दिवाळीआधीच त्यांचा मृत्यू झाल्याने ढाका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ओढणीनं पेट घेतला आणि घडली दुर्घटना
नवरात्रौत्सवात अष्टमीच्या दिवशी देवीसाठी होम करायचं ठरलं. सगळी तयारी झाली आणि होमही सुरु झाला. या होमकुंडात तूप टाकत असताना अचानक सरिता यांच्या ओढणीने पेट घेतला. पूजेसाठी बसल्या असताना अचानक त्यांच्या ओढणीला आग लागली. ही आग विझवेपर्यंत उशीर झाला आणि त्या यामध्ये होरपळल्या. त्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेदरम्यान त्या खूप भाजल्या होत्या.
advertisement
मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
33 वर्षांच्या सरिता ढाका यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. ही धक्कादायक घटना डोंबिवली पूर्वेकडील टिळकनगर इथे घडली आहे. आधी ओढणी पेटली आणि नंतर अंगावरच्या कपड्यांनी पेट घेतला. icu मध्ये त्या जवळपास दोन आठवडे मृत्यूशी झुंज देत होत्या. मात्र ही झुंज अपयशी झाली आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
सरिता यांचे पती आणि त्या डोंबिवली इथे राहात होत्या. त्यांनी घट बसवले होते. अष्टमीला पूजेचा घाट घातला. सागरसंगीत नैवेद्य तयार केला. सरिता ढाका पूजा करुन होमसाठी बसल्या. होम कुंडात तूप टाकताना किटाळ उडालं आणि ओढणी जळाली. ओढणी पाठोपाठ ड्रेसही जळाला. यामध्ये त्या गंभीर भाजल्या, त्यांना उपचारासाठी एम्समधील रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
October 16, 2025 12:21 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
डोंबिवलीत अष्टमीला हवनकुंडात तूप टाकलं अन् ओढणी पेटली, 2 आठवड्यानंतर दिवाळीआधी महिलेची प्राणज्योत मालवली