SCI Mumbai Bharti 2025 : शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, इतक्या पदांसाठी भरती; लगेचच करा अर्ज...
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
SCI Mumbai Bharti 2025 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कोनाकोपर्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता.
नोकरीच्या शोधात असणार्यांसाठी नोकरीच्या बाबतीत मोठी संधी आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नुकतीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून (Shipping Corporation of India Limited) ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विशेष म्हणजे कोणत्याही कोनाकोपर्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणते महत्वाचे कागदपत्रे आहेत...
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह अशा दोन पदांसाठी भरती होणार आहे. 75 पदांसाठी ही पदभरती केली जाणार असून अर्जदारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. या भरतीची परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. तरूणांसाठी या सरकारी नोकरीच्या माध्यमातून खरोखरच मोठी संधी आहे. 6 सप्टेंबरपासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुरूवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2025 आहे. नोकरीचं ठिकाण मुंबई असणार आहे.
advertisement
असिस्टंट मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. भरती प्रक्रियेसाठी कमीत कमी वयोमर्यादा 18 असून जास्तीत जास्त वय 27 वर्षे इतके आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग व्यक्ती आणि माजी सैनिक साठी 100 रूपये इतकी परिक्षेची फी आहे. तर, खुला प्रवर्गासाठी, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी 500 रूपये इतकी अर्जाची फी असणार आहे. https://onlineapply.net.in/Register या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना वाचून घ्यावी.
advertisement
असिस्टंट मॅनेजर पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे की, MBA /MMS/ PG पदवी /PG डिप्लोमा/ इंजिनिअरिंग पदवी किंवा CS या पदव्यांची आवश्यकता आहे. 60% गुणांची आवश्यकता आहे. तर, एक्झिक्युटिव्ह पदासाठी BBA/ BMS/ पदवी किंवा इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवीची गरज आहे. 60% गुणांची आवश्यकता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 9:52 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
SCI Mumbai Bharti 2025 : शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी भरती, इतक्या पदांसाठी भरती; लगेचच करा अर्ज...