ATM वरचं हे छोटं छिद्र बनलं चोरट्यांचं नवं हत्यार, क्षणात असं होऊ शकतं तुमचं खातं साफ
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आजच्या डिजिटल युगात एटीएममधून पैसे काढणं ही अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. पण खरी अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा चोर संधीचा फायदा घेत लोकांना ठगतात.
मुंबई : टेक्नोलॉजी जसजशी पुढे गेली आहे, तसं तसा त्याचा फायदा सायबर ठगी करणाऱ्या मंडळींना देखील होऊ लागला आहे. याचा वापर करत ते देखील लोकांवा फसवण्याचे वेगवेगळे मार्ग अवलंबतात. आता हेच बघा ना पैशांचा सगळा व्यवहार आता घर बसल्या ऑनलाइनवर होऊ लागला आहे, ज्यामुळे लोकांचा वेळ वाचतो आणि त्यांना घरबसल्या सगळ्या सोयींचा फायदे घेता येतो. पण या उलट सायबर गुन्हेगार याच गोष्टीचा फायदा घेत लोकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात करत असतात.
आजच्या डिजिटल युगात एटीएममधून पैसे काढणं ही अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. पण खरी अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा चोर संधीचा फायदा घेत लोकांना ठगतात. अनेकांना वाटतं की ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर कॅन्सल बटण दाबलं म्हणजे सुरक्षितता पक्की झाली. पण प्रत्यक्षात ठग ‘शोल्डर सर्फिंग किंवा गुप्त कॅमेरे लावून तुमची माहिती चोरतात.
एटीएम वापरताना काय लक्षात ठेवाल?
एटीएममध्ये पैसे काढताना किंवा बॅलन्स तपासताना आपल्या आसपासच्या हालचालींवर लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पिन टाकताना नेहमी कीपॅड हाताने झाकून ठेवा. कोणीतरी अगदी जवळ उभं राहिलं असेल किंवा संशयास्पद वाटत असेल, तर तात्काळ सावध व्हा.
advertisement
ठग एटीएममधील किंवा कुठल्याही पेमेंट मशीनजवळ उभं राहून तुमच्या बोटांच्या हालचालींवरून पिन क्रमांक ओळखतात. तुमच्या नकळत ते ही माहिती मिळवतात आणि काही मिनिटांतच खातं रिकामं करू शकतात.
पिनहोल कॅमेरांचा सापळा
आजकाल ठग अतिशय लहान कॅमेरे वापरतात जे डोळ्यांना सहज दिसत नाहीत. हे कॅमेरे कार्ड रीडर, कीपॅड किंवा रोख रकमेच्या स्लॉटजवळ बसवलेले असतात. तुम्ही पिन टाकताच ती माहिती रेकॉर्ड केली जाते आणि नंतर त्याचा वापर करून तुमचे पैसे चोरले जातात. त्यामुळे एटीएम वापरण्यापूर्वी मशीन नीट तपासा.
advertisement
पण एवढं सगळं करुन देखील जर तुमची फसवणूक झालीच तर मग तुम्ही काय कराल?
सावधगिरी बाळगूनही फसवणूक होऊ शकते. अशा वेळी घाबरू नका, तर तात्काळ खालील पावले उचला:
लगेच तुमचं एटीएम कार्ड ब्लॉक करा.
बँकेला संपूर्ण माहिती द्या आणि लेखी तक्रार नोंदवा.
प्रकरण गंभीर असल्यास पोलीस ठाण्यात FIR दाखल करा.
advertisement
जितक्या लवकर कृती कराल, तितकी पैशांची परतफेड होण्याची शक्यता जास्त राहते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 9:53 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
ATM वरचं हे छोटं छिद्र बनलं चोरट्यांचं नवं हत्यार, क्षणात असं होऊ शकतं तुमचं खातं साफ