ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गामुळे 6 महिने वाहतूक कोंडीचा त्रास, या पर्यायी मार्गानं करा प्रवास
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
Thane–Borivali Underground Road Construction Begins : ठाणे–बोरीवली भूमिगत रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होणार आहे. पुढील सहा महिने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार असून महापालिकेकडून वाहतूक बदलांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
मुंबई : ठाणे, भिवंडी, कल्याणकरांना बोरिवली गाठण्यासाठी घोडबंदर मार्गाचा वापर करावा लागतो; परंतु या मार्गाची अवस्था अत्यंत वाईट आहे. घोडबंदर घाट रस्त्यात दररोज वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागत असून कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे ठाणे-बोरिवली प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सध्या सुरू आहे.
सहा महिन्यांचा ट्रॅफिक ब्लॉक!
बोरिवली भूमिगत रस्त्याच्या कामासाठी वाहतूक विभागाने मुल्ला बागकडून नीलकंठ ग्रीनकडे जाणारी रस्त्यावरील वाहतूक सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सध्या घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात सुरू झाले आहे. या भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून बोगदे तयार केले जात आहे. त्यानिमित्ताने विविध वाहने, यंत्रांची वाहतूक करणारी वाहने या भागातून वाहतूक करणार आहे. या कामादरम्यान ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत.
advertisement
असे असतील पर्यायी मार्ग!
घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी, मानपाडा, ब्रम्हांड भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहन चालक मुल्ला बाग मार्गे वाहतूक करत असतात. येथील वाहतूक बदलाचा परिणाम वाहन चालकांना होण्याची शक्यता आहे. 14 नोव्हेंबर ते 11 मे 2026 पर्यंत हा रस्ता बंद ठेवला जाणार आहे. वाहतूक विभागाने या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध हिल क्रेस्ट सोसायटी, मुल्ला बागकडून नीलकंठ ग्रीनकडे जाणारी वाहने नीलकंठ ग्रीनकडून मुल्ला बागकडे येणाऱ्या रस्त्यावर बौरेकेडिंग केलेल्या मार्गाच्या विरुद्ध दिशेने उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर हिल क्रेस्ट सोसायटी, मुल्ला बागकडून नीलकंठ ग्रीनकडे जाणारी वाहने नीलकंठ ग्रीनकडून मुल्ला बागकडे येणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंग केलेल्या मार्गाने विरुद्ध दिशेने जातील.
advertisement
1)बंदीची वेळ : रोज रात्री 1:00 ते सकाळी 6:00 आणि दुपारी 12:00 ते सायंकाळी 6:00
2)बंद मार्ग : हिल क्रेस्ट सोसायटी, मुल्ला बागकडून नीलकंठ ग्रीनकडे जाणारा मार्ग
3)नियमातून वगळलेली वाहने : पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2025 10:48 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ठाणे-बोरिवली भूमिगत मार्गामुळे 6 महिने वाहतूक कोंडीचा त्रास, या पर्यायी मार्गानं करा प्रवास


