Shocking! गर्लफ्रेंडच्या आईवडिलांना इम्प्रेस करण्याच्या नादात आयुष्य गमावलं, बॉयफ्रेंडचा मृत्यू
- Published by:Priya Lad
Last Updated:
Boyfriend Die While Impress Girlfriend Parents : एक तरुण त्याच्या गर्लफ्रेंडच्या आईवडिलांना पहिल्यांदाच भेटणार होता. त्यांना इम्प्रेस करण्याच्य नादात त्याने असं काही केलं की त्याचा जीव गेला आहे.
बीजिंग : प्रेमात अग्निपरीक्षा द्यावी लागते असं म्हणतात. प्रेम करतात त्यांनाच माहिती की लग्नासाठी त्यांना किती धडपड करावी लागते. त्यातील सगळ्या मोठी परीक्षा असते ती गर्लफ्रेंडच्या आईवडिलांना लग्नासाठी तयार करणं. असाच एक तरुण त्याच्या गर्लफ्रेंडच्या आईवडिलांना पहिल्यांदाच भेटणार होता. त्यांना इम्प्रेस करण्याच्य नादात त्याने असं काही केलं की त्याचा जीव गेला आहे.
चीनच्या हेनान प्रांतातील ही धक्कादायक घटना. शिनशियांग शहरात राहणारा 36 वर्षांचा ली झियांग. काही महिन्यांपूर्वी त्याची एका तरुणीशी ओळख झाली. आधी मैत्री मग त्यांची मैत्री प्रेमात बदलली. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला पण त्यासाठी आधी कुटुंबाला भेटवणं गरजेचं होतं. त्याची तयारी त्यांनी केली.
advertisement
गर्लफ्रेंडच्या पालकांना भेटायचं म्हणजे मोठी परीक्षाच. त्यांच्यावर चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे, असं प्रत्येक बॉयफ्रेंडला वाटतं. यासाठी गर्लफ्रेंड काही टिप्स देते आणि बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या पालकांना इम्प्रेस करण्यासाठी शक्य ते सगळं करतो. लीनेही तेच केलं. त्याचं वजन जास्त होतं, तो लठ्ठ होता. आता भले मुलीला आवडला तर मुलीच्या पालकांना असा जावई तर आवडणार नाही. म्हणून लीने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
मीडिया रिपोर्टनुसार ली 30 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल झाला. 2 ऑक्टोबर रोजी त्याची सर्जरी झाली. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. ऑपरेशननंतर त्याला काही काळासाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. सर्व काही सामान्य वाटत होतं, पण नशिबाचं प्लॅनिंग काही वेगळंच होतं. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी लीची प्रकृती अचानक बिघडली. त्याचा श्वास थांबला, त्याला ताबडतोब आयसीयूमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण 5 ऑक्टोबर रोजी श्वसनक्रिया बंद पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
advertisement
लीला बऱ्याच काळापासून जलद वजन वाढणं, मोठ्याने घोरणं, उच्च रक्तदाब आणि फॅटी लिव्हरचा त्रास होता.. डॉक्टरांनी त्याला मेटाबॉलिक सिंड्रोम असल्याचंही निदान केलं. तर लीच्या कुटुबाने आपल्या मुलाच्या मृत्यूसाठी रुग्णालयाला जबाबदार धरलं आहे. रुग्णालयावर अनेक आरोप केले. ऑपरेशनपूर्वी रुग्णालयाने त्याची योग्यरित्या तपासणी केली का?, धोके माहित असूनही शस्त्रक्रिया करण्यात आली का?, त्याची प्रकृती बिघडल्यावर वेळेवर उपचार देण्यात आले का? असे सवाल कुटुंबाने उपस्थित केले.
advertisement
रुग्णालयाने कुटुंबाच्या आरोपांना उत्तर देताना म्हटलं की रुग्ण शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीयदृष्ट्या योग्य होता आणि त्याची प्रकृती बिघडल्यानंतर लगेचच उपचार सुरू करण्यात आले. 10 ऑक्टोबर रोजी रुग्णालय आणि कुटुंब दोघांनीही हेल्थ कमिशनला पोस्टमॉर्टेम करण्याची विनंती केली. सर्व निर्णय त्या अहवालावर आधारित असतील.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 16, 2025 10:32 AM IST
मराठी बातम्या/Viral/
Shocking! गर्लफ्रेंडच्या आईवडिलांना इम्प्रेस करण्याच्या नादात आयुष्य गमावलं, बॉयफ्रेंडचा मृत्यू


