एका पुरुषाच्या 6-6 बायका, सगळ्या एकाच वेळी प्रेग्नंट; आता अशी अवस्था झाली की...
- Published by:Priya Lad
Last Updated:
Man Six Wife Pregnant At Same Time : एक नवरा सहा पत्नींसोबत राहतो. पण तो सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे. खरं तर त्याच्या सर्व बायका सध्या प्रेग्नंट आहेत. त्या 5-7 महिन्यांच्या गर्भवती आहेत.
नवी दिल्ली : असे काही पुरुष ज्यांनी एकापेक्षा अधिक बायका केल्या आहेत. अशाच पुरुषांपैकी एक सध्या चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे या पुरुषाने दोन-तीन नव्हे तर तब्बल सहा-सहा बायका केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे या सहाही बायका एकाच वेळी प्रेग्नंट झाल्या आहेत. त्यामुळेच या पुरुषाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
केनियातील पॉलिगॅमी किंग अकुकु डेंजरशी या पुरुषाची तुलना केली जाते आहे. सहा लग्न करणारा हा आफ्रिकेतील पुरुष. त्याच्या सर्व बायका एकत्र राहतात. एक नवरा सहा पत्नींसोबत राहतो. पण तो सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे. खरं तर त्याच्या सर्व बायका सध्या प्रेग्नंट आहेत. त्या 5-7 महिन्यांच्या गर्भवती आहेत. त्यांच्या घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. ज्यात या प्रेग्नंट बायका दिसत आहेत.
advertisement
याआधी भारतातही असा एक पुरुष चर्चेत आला होता, जेव्हा त्याचा दोन बायका एकाच वेळी प्रेग्नंट राहिल्या होत्या. अरमान मलिक असं त्याचं नाव. पण त्या प्रकरणात आयव्हीएफचा वापर करण्यात आला. पण आफ्रिकेतील या व्यक्तीच्या बाबतीत तसं नाही. त्याच्या सर्व पत्नी नैसर्गिकरित्या प्रेग्नंट राहिल्याचं सांगितलं जातं आहे.
advertisement
प्रत्येकीत फक्त काही दिवसांचा फरक आहे.
पहिली पत्नी - 7 महिने
दुसरी - 6.5 महिने
तिसरी - 6 महिने
चौथी - 5.5 महिने
पाचवी - 5 महिने
सहावी - 5 महिने
@kenyan_statue_man इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता त्याच्या सहा प्रेग्नंट बायका आणि त्यांच्यासोबत तो दिसतो आहे. घरात असं वातावरण आहे की जणू काही खाजगी प्रसूतीगृह उघडलं आहे. हे पाहून लोकांनाही आश्चर्य वाटतं आहे.
advertisement
advertisement
एकाच वेळी सहा गर्भवती पत्नींना सांभाळणं सोपं नाही. त्यांना सकाळी 5 वाजता उलट्या सुरू होतात. प्रत्येकाची इच्छाही वेगवेगळी असते. ज्यामुळे हे नवऱ्याच्या चांगलंच अंगलट आलं आहे.
100 पत्नी आणि 500 मुलं असलेला राजा
आजही, जगात असे अनेक देश आहेत जिथं पॉलिगामी म्हणजे बहुपत्नीत्वाला कायदेशीर मान्यता आहे. शिवाय, असे अनेक देश आहेत जिथे हे कायदे अजूनही लागू आहेत आणि परिणामी ते या परंपरेला चालना देण्यासाठी काम करत आहेत. अशाच देशांपैकी एक आफ्रिकन देश कॅमेरून. जिथं एकापेक्षा जास्त महिलांशी लग्न करण्याची प्रथा आहे. एक पुरूष त्याला पाहिजे तितक्या वेळा लग्न करू शकतो आणि त्याला कोणतीही मर्यादा नाही.
advertisement
कॅमेरूनचा राजा अबुम्बी दुसरा ज्याच्या 100 बायका आणि 500 मुलं आहेत. 1968 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर राजा अबुम्बी दुसरा सिंहासनावर बसला. अबुम्बी दुसरा कॅमेरूनमधील बाफुटचा अकरावा फॉन किंवा राजा बनला. मीडिया रिपोर्ट्सनुसार कॅमेरूनमधील बाफुटमध्ये अशी प्रथा आहे की राजाच्या मृत्यूनंतर, पुढील राजाला त्याच्या सर्व मृत राजाच्या राण्यांचा वारसा मिळतो. त्यानुसार वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राण्यांना त्याने आपली पत्नी म्हणून स्वीकारलं आणि त्याच्या 100 बायका झाल्या. दिवंगत वडिलांकडून 72 राण्या आणि त्यांची मुलं वारशाने मिळाली, तर त्याने स्वतः 28 लग्न केली आहेत. प्रथेनुसार अबुम्बीला आता जवळजवळ 100 बायका आणि 500 हून अधिक मुलं आहेत.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 12, 2025 9:26 AM IST


