तळोजा कारागृहात श्रीमंत, गरीब कैद्यांमध्ये संघर्ष, लाच देऊन घेतात चवीष्ट जेवण; रेट कार्ड पाहून बसेल धक्का
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
तळोजा कारागृहात श्रीमंत आणि गरीब कैद्यांमध्ये तुरुंग अधिकाऱ्यांना लाच देऊन चविष्ट भोजनाची सोय केली जात असल्याचा आरोप होत आहे.
खारघर : कारागृहात कैद्यांना अनेकदा व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचे प्रकार समोर येत असतात. तुरुंगात मोबाईल फोन, तंबाखू, अंमली पदार्थ सापडल्याच्या धक्कादायक प्रकारही घडले आहेत. दरम्यान, आता तळोजा कारागृहात कैद्यांमध्ये कँटिनच्या जेवणावरून संघर्ष पेटला आहे. श्रीमंत आणि गरीब कैद्यांमध्ये तुरुंग अधिकाऱ्यांना लाच देऊन चविष्ट भोजनाची सोय केली जात असल्याचा आरोप होत आहे. व्हीआयपी कैद्यांना चिकन, मटण, चायनीज जेवण दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात कारागृहातील कैद्यानेच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केलीय.
तळोजा कारागृहातील भ्रष्टाचारा विषयी कारागृहातील कैदी सुरेंद्र गडलिंग यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली आहे. खारघरच्या तळोजा जेलमधील कारागृहात कॅन्टीन मधून दिलं जात आहे. कारागृहातील अनेक व्हीआयपी कैद्यांना व्हीआयपी सुविधा दिली जात असल्याचे आरोप आहे. तळोजा कारागृहात सध्या आमदार गणपत गायकवाड यांच्यासह अनेक दिग्गज कैदी आहेत.
खारघर कारागृहातील तुरुंग अधिकारी सुनील पाटील आणि इतर अधिकाऱ्याकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचं या तक्रारीत म्हटलंय. इतकंच नाही तर तळोजा कारागृहातील व्हीआयपी कैऱ्यांना दिला जाणाऱ्या मेन्यूचं रेट कार्डच तक्रारीत नोंद केलं आहे. फ्राइड चिकन २ हजार रुपये तर मटण मसाला ८ हजार रुपये. मटण करी ७ हजार रुपये असे पैसे घेतले जात असल्याचं कैद्याने तक्रारीत म्हटलंय.
advertisement
फ्राईड चिकन 2000 रुपये
हैदराबादी बिर्याणी 1500रुपये
शेजवान राईस 500रुपये
प्रॉन्स बिर्याणी 2000 रुपये
चिकन मसाला1000रुपये
मन चुरण चिकन1500रुपये
चिकन चिल्ली1500रुपये
मटन मसाला8000रुपये
मटन करी7000रुपये
गाल गोष्ट2000
व्हेज मंचुरियन1000
व्हेज बिर्याणी1000
अंडा बिर्याणी500
स्पेशल व्हेज पकोडे1000
व्हीआयपी मेनूचे रेट कार्ड हे तळोजा कारागृहातील कारागृहातील कॅन्टीनमधून कारागृहात बंदी असलेल्या व्हीआयपी कैद्यांना साडेपाच ते साडेसहा या वेळेत देत असल्याबाबतची तक्रार सुरेंद्र गडलिंग यांनी लाच लुचपत विभागाकडे दिली आहे. या तक्रारीनंतर खळबळ उडाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 07, 2024 3:51 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
तळोजा कारागृहात श्रीमंत, गरीब कैद्यांमध्ये संघर्ष, लाच देऊन घेतात चवीष्ट जेवण; रेट कार्ड पाहून बसेल धक्का








