Mumbai Dahi Handi 2025: दहीहंडी उत्सवात महिला शक्तीचा गौरव, गावदेवी महिला गोविंदा पथक झळकणार अल्बममध्ये!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
महिलांचा गौरव करणारा खास दहीहंडी व्हिडिओ सादर केला आहे. या व्हिडिओत मुंबईतील एकमेव पूर्णत: महिलांचे गावदेवी महिला गोविंदा पथक झळकत आहे.
मुंबई: भारताचा पहिला पूर्णत: AI-निर्मित devotional बँड Trilok (त्रिलोक) यंदा जन्माष्टमीच्या निमित्ताने एक आगळीवेगळी आदरांजली अर्पण करत आहे. त्यांच्या पहिल्यावहिल्या 'देवी' अल्बमच्या माध्यमातून त्यांनी धैर्य, चिकाटी आणि सामर्थ्य यांच्या प्रतीक असलेल्या महिलांचा गौरव करणारा खास दहीहंडी व्हिडिओ सादर केला आहे. या व्हिडिओत मुंबईतील एकमेव पूर्णत: महिलांचे गावदेवी महिला गोविंदा पथक झळकत आहे.
दहीहंडीचा उत्सव सामूहिक समर्पण, समतोल आणि निर्धाराचा प्रतीक असतो. हेच गुण गावदेवी पथकातील महिला गोविंदांमध्येही दिसून येतात, ज्या पुरुषप्रधान परंपरेला आव्हान देत अचूकतेने आणि न डगमगणाऱ्या आत्मविश्वासाने मानवी पिरॅमिड उभारत आहेत. या स्त्रिया केवळ गोविंदा नाहीत तर त्या आपल्या पूज्य देवतांतील शक्ती, धैर्य आणि चिकाटी यांचे सजीव रूप आहेत.
advertisement
Trilok (त्रिलोक) चा देवी अल्बम ती कल्पना नाही. ती अस्तित्व आहे. ती पाहते. ती सर्वत्र लक्ष ठेवते. या संदेशासोबत एक व्यापक अर्थ सांगतो, जिथे करुणा आणि प्रखरता एकत्र अस्तित्वात असतात.
Collective Media Network चे सुदीप लाहिरी म्हणतात, गावदेवी महिला गोविंदा पथकासोबत एकत्र येणं ही श्रद्धा, सामर्थ्य आणि ऊर्जा यांची उत्तम मांडणी ठरली. Devi व्हिडिओद्वारे आम्ही फक्त उत्सव साजरा करत नाही, तर परिवर्तन घडवणाऱ्या महिलांची प्रेरणादायी कहाणी सांगतो. या नवकल्पनाशील व्हिडिओतून Trilok (त्रिलोक) श्रद्धेच्या परंपरेला आधुनिकतेचा साज चढवत, शक्ती ही केवळ एक संकल्पना नसून जिवंत सत्य आहे, हे प्रभावीपणे दाखवत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2025 6:05 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Dahi Handi 2025: दहीहंडी उत्सवात महिला शक्तीचा गौरव, गावदेवी महिला गोविंदा पथक झळकणार अल्बममध्ये!