Vasai Virar News : महापालिकेसाठी बविआचा गटनेता ठरला,हितेंद्र ठाकूरांचा शिलेदार सभागृह दणाणून सोडणार

Last Updated:

बहुजन विकास आघाडीने आपला गटनेता ठरवला आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या निकटवर्तीयाची या पदावर वर्णी लागली आहे. त्यामुळे गटनेतेपदी कुणाला संधी मिळाली आहे? हे जाणून घेऊयात.

vasai virar news
vasai virar news
Vasai Virar News : वसई विरार महापालिका निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने 71 जागा जिंकून आपली सत्ता कायम ठेवली आहे. त्यामुळे आता बहुजन विकास आघाडीचाच महापौर महापालिकेवर बसणार आहे.पण त्याआधी महापौरपदाचे आरक्षण 22 जानेवारी 2026 ला पार पडणार आहे.त्याआधीच बहुजन विकास आघाडीने आपला गटनेता ठरवला आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या निकटवर्तीयाची या पदावर वर्णी लागली आहे. त्यामुळे गटनेतेपदी कुणाला संधी मिळाली आहे? हे जाणून घेऊयात.
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकुर,नारायण मानकर, अजीव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या 71 नगरसेवकाच्या सहभागाने झालेल्या बैठकीत बहुजन विकास आघाडीच्या गटनेतेपदी प्रवीण शेट्टी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी सर्वानुमते प्रवीण शेट्टी यांच्या नावावर गटनेता म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले.
कोण आहेत प्रवीण शेट्टी?
वसईतील दाक्षिणात्य समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माजी महापौर आणि हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्तीय प्रवीण अण्णा शेट्टी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मावळत्या महापालिकेमध्ये प्रवीण शेट्टी हे अखेरचे महापौर होते. ते दाक्षिणात्य समाजातून आलेले असले तरी जन्मजात ते वसईकर आहेत.अस्सलिखित मराठी बोलण आणि मराठीत सुसंवाद करण त्यांना इतकं जमत की त्याच्यापुढे युक्तीवाद करणारा मराठी माणूस देखील फिका पडेल.
advertisement
खरं तर महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर पदाची निवडणुक पार पडणार आहे. महापौर पदाच्या निवडणुकीपुर्वी कोणत्याही प्रकारचा दगा फटका होऊ नये, नगरसेवक फुटू नये म्हणून बविआने प्रवीण शेट्टीच्या रूपात गटनेता निवडला आहे. येत्या एक दोन दिवसात नवनिर्वाचित नगरसेवकांना घेऊन कोकण भवन येथे जाणार असून तेथे आपल्या गटाची नोंदणी केली जाणार आहे.
दरम्यान महापालिका निवडणुकीत बविआने 115 पैकी 70 जागा जिंकल्या आहेत. एक जागा काँग्रेसने जिंकली आहे, तर भाजप शिवसेनेने मिळून 44 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीनंतर आता महापौरपदी कोणत्या पक्षाचा उमेदवार विराजमान होतो,याची चर्चा रंगली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Vasai Virar News : महापालिकेसाठी बविआचा गटनेता ठरला,हितेंद्र ठाकूरांचा शिलेदार सभागृह दणाणून सोडणार
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement