Mumbai– Ahmedabad Bullet Train: मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशनचे काम बीएमसीकडून बंद; कारण काय?

Last Updated:

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील स्थानकाचे बांधकाम मुंबई महापालिकेने काही कारणास्तव बंद केले आहे.

वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन : बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम पालिकेकडून बंद!
वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन : बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम पालिकेकडून बंद!
मुंबई: मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे- कुर्ला संकुल (बीकेसी) येथील स्थानकाचे बांधकाम वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई महापालिकेने तात्पुरते बंद केले आहे. पालिकेने बुधवारी संबंधित यंत्रणेला काम बंद करण्याची नोटीस बजावली असून आवश्यक सुधारणा पूर्ण होईपर्यंत हे काम पुन्हा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे देशातील पहिल्या अति जलद रेल्वे प्रकल्पाच्या वेळा पत्रकावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई- अहमदाबाद हे अंतर अवघ्या दोन ते अडीच तासांत पार करण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) कडून 508 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पातील पहिले स्थानक बीकेसी येथे उभारले जात असून सध्या तेथे मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. मात्र या कामादरम्यान धूळ नियंत्रण, पाण्याचा शिडकावा, झाकणांची व्यवस्था अशा वायू प्रदूषण नियंत्रण उपायांची अंमलबजावणी होत नसल्याचे पालिकेच्या तपासणीत आढळून आले. यापूर्वी पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावून आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे आदेश दिले होते. तरीही नियमांचे पालन न झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले.
advertisement
उच्च न्यायालयाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पालिकेला कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बुधवारी पालिकेच्या पथकाने बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाच्या कामाची तसेच वांद्र्यातील उच्च न्यायालय संकुलाच्या पाडकामाची पाहणी केली. दरम्यान, अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो 2B मार्गिका आणि वांद्र्यातील उच्च न्यायालयाच्या पाडकामातही प्रदूषण नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही प्रकल्पांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून संबंधित यंत्रणांनी लवकरच आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सध्या या कामांवर बंदी घालण्यात आलेली नसली तरी ठरलेल्या वेळेत सुधारणा न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai– Ahmedabad Bullet Train: मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशनचे काम बीएमसीकडून बंद; कारण काय?
Next Article
advertisement
Bharat Gogawale: भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कारवाईचं कारण काय?”
भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कार
  • भरत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास

  • विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने तब्बल तीन वेळा फेटाळला आहे.

  • आता महाड पोलीस कोणती कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

View All
advertisement