Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, निवडणुका संपल्या आता पाणी जपून वापरा! 5 वार्डांत कमी दाबाने पाणी, कोणत्या भागांना फटका?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
महानगर पालिकेच्या निवडणूकीनंतर मुंबईकरांना पाणी टंचाईच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागतोय तेच दुसऱ्या दिवशी पाणी कपात जाहीर केली आहे.
महानगर पालिकेच्या निवडणूकीनंतर मुंबईकरांना पाणी टंचाईच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागतोय तेच दुसऱ्या दिवशी पाणी कपात जाहीर केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मेट्रो लाईन 7A प्रकल्पासोबत जोडलेल्या महत्त्वपूर्ण पाईपलाइन कनेक्शनचे काम केले जाणार आहे, यामुळे पाच वॉर्डांचा पाणी पुरवठा खंडीत केला जाणार आहे. 20 जानेवारीपासून पाच महानगरपालिका वॉर्डांमधील रहिवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठा केले जाणार आहेत किंवा थेट पाणीपुरवठाच खंडित केला जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना पाण्याच्या समस्या उद्भवू शकतात.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पाणीकपातीची समस्या नागरिकांना दोन दिवस उद्भवणार आहे. मंगळवार, 20 जानेवारी रोजी सकाळी 9 ते गुरुवार, 22 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 44 तास पाण्याच्या पाईपलाईनचे काम केले जाणार आहे. या कालावधीत, जी उत्तर, के पूर्व, एस, एच पूर्व आणि एन वॉर्डमधील काही वॉर्डात पाणीपुरवठा कमी दाबाने केला जाईल तर काही वॉर्डात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केला जाईल. के पूर्व वॉर्डमधील 2,400 मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा मुख्य पाणी पाईपलाईनच्या क्रॉस-कनेक्शनमुळे हा व्यत्यय येत आहे. एमएमआरडीएच्या मेट्रो लाईन 7A प्रकल्पाच्या बांधकामासाठी पाइपलाइन वळवावी लागली. आता बीएमसी या भागामध्ये पाईपलाईनचे काम करणार आहे.
advertisement
जी उत्तर वॉर्ड (धारावी भाग)- 20 आणि 21 जानेवारी रोजी सुधारित वेळेत सकाळ आणि संध्याकाळच्या वेळात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
के पूर्व वॉर्ड (अंधेरी पूर्व आणि आसपासचा परिसर)- 20 आणि 21 जानेवारी रोजी एमआयडीसी, मरोळ, चकाला, विमानतळ परिसर, सीप्झ आणि आसपासचा निवासी आणि औद्योगिक झोनसह अनेक भागात पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहील. काही भागात संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, तर काही भागात 21 जानेवारी रोजी सकाळी लवकर पाणीपुरवठा बंद राहील.
advertisement
एस वॉर्ड (भांडुप पश्चिम, विक्रोळी पश्चिम, कांजूरमार्ग पश्चिम)- अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, तर मोराजी नगर, गौतम नगर, जयभीम नगर आणि बेस्ट नगर यासारख्या भागात नियोजित वेळेत पूर्णपणे बंद राहील.
एच पूर्व वॉर्ड- 20 आणि 21 जानेवारी रोजी संपूर्ण वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि मोतीलाल नगर परिसरात रात्री उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे.
advertisement
एन वॉर्ड (घाटकोपर आणि विक्रोळी क्षेत्र)- 20 आणि 21 जानेवारी रोजी गोदरेज कंपाऊंड, आर सिटी मॉल, कैलास कॉम्प्लेक्स आणि लगतच्या परिसरांसह अनेक निवासी आणि व्यावसायिक झोनमध्ये नियमित वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित किंवा कमी दाबाने केला जाणार आहे, त्या भागातील रहिवाशांना आधीच जास्तीचे पाणी भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच, पाणी जपून आणि साठवून वापरण्याचे आवाहन केले गेले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, नागरिकांना पुढील काही दिवस पिण्याचे पाणी उकळून आणि फिल्टर करून पिण्याचा सल्ला देखील बीएमसीने दिला आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 8:51 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, निवडणुका संपल्या आता पाणी जपून वापरा! 5 वार्डांत कमी दाबाने पाणी, कोणत्या भागांना फटका?










