Western Railway: नायगाव स्थानकातील महत्त्वाचा पूल पूर्णपणे बंद,नेमकं कारण काय?,'या' पर्यायी मार्गाचा करा वापर
Last Updated:
Western Railway News : जर तुम्हीही पश्चिम रेल्वे मार्गावरुन दररोज प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. नक्की काय प्रवाशांनी खबरदारी याबाबत माहिती घ्या.
वसई : पश्चिम रेल्वे मार्गातील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जिथे असलेल्या नायगाव स्थानकातील एक महत्त्वाचा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. नेमका हा पुल किती दिवस आणि कोणत्या कारणांमुळे बंद असणार आहे त्याबाबत प्रवाशांनी सविस्तर माहिती जाणून घ्या.
स्थानकांचे रूप पालटणार
पश्चिम रेल्वेने वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव या स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी विविध विकासकामे सुरू केली आहेत. या कामांमध्ये एलिव्हेटेड डेक उभारणे, पादचारी पूल दुरुस्त करणे, जिन्यांची सुधारणा करणे तसेच फलाटांचा विस्तार करणे यांचा समावेश आहे.
कारण काय अन् किती दिवस पूर राहणार बंद?
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेअंतर्गत येणाऱ्या नायगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि 3 ला जोडणारा उत्तरेकडील जुना पादचारी पूल 14 फेब्रुवारीपासून प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलावर देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असून तो सुमारे दीड महिना वापरासाठी उपलब्ध नसणार आहे.
advertisement
वापरा 'हा' पर्यायी मार्ग
नायगाव स्थानकातील उत्तरेकडील पादचारी पूल हा महत्त्वाचा दुवा असल्याने त्याच्या विस्तार आणि नूतनीकरणासाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. सध्या पुलांची उंची वाढवण्याचे आणि फलाट रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. दरम्यानप्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी स्थानकातील इतर तीन पादचारी पूल तसेच फलाटांना जोडणारा भुयारी मार्ग वापरावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 1:10 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Western Railway: नायगाव स्थानकातील महत्त्वाचा पूल पूर्णपणे बंद,नेमकं कारण काय?,'या' पर्यायी मार्गाचा करा वापर








